दोन दिव्यांग मुलांचा मातेने घेतला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 04:51 IST2018-05-13T04:51:13+5:302018-05-13T04:51:13+5:30

पाच वर्षांचा मुलगा आणि आठ महिन्यांच्या मुलीला मातेने पाण्याच्या टाकीत बुडवून मारल्याची थरारक घटना शनिवारी सकाळी

Two divorced children took the life of mother | दोन दिव्यांग मुलांचा मातेने घेतला जीव

दोन दिव्यांग मुलांचा मातेने घेतला जीव

पुणे : पाच वर्षांचा मुलगा आणि आठ महिन्यांच्या मुलीला मातेने पाण्याच्या टाकीत बुडवून मारल्याची थरारक घटना शनिवारी सकाळी पळसदेव गावाजवळच्या माळेवाडी- शिंदेवस्ती येथे घडली. ही दोन्ही मुले दिव्यांग असल्याने त्यांची आई नैराश्यग्रस्त होती.
प्रतीक महेश बनसुडे (५), कार्तिकी (८ महिने) अशी मृतांची, तर सुरेखा असे त्यांच्या मातेचे नाव आहे. त्यांची आजी शोभा धोंडिबा बनसुडे (७०) यांनी याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात याची खबर दिली.
शोभा मुलगा महेश, सून सुरेखा, नातू प्रतीक व नात कार्तिकी यांच्यासोबत शिंदेवस्ती येथे राहतात. शनिवारी सकाळी महेश साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेले होते. शोभा नेहमीप्रमाणे शेतात गेल्या. त्या वेळी त्यांनी हे कृत्य केले, अशी माहिती समजते.

Web Title: Two divorced children took the life of mother