शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Pune | लोणावळ्यात मोटार सायकलच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 14:20 IST

अपघातातील दोन्ही मयत हे वीटभट्टी कामगार असून, दोघे सख्खे साडू होते...

लोणावळा (पुणे) : जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यातील रिदम हॉटेलसमोर एका अज्ञात वाहनाने मोटार सायकलला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल वरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या दरम्यान घडली. अपघातातील दोन्ही मयत हे वीटभट्टी कामगार असून, दोघे सख्खे साडू होते.

दिपक परशुराम पवार (वय ४०) व लक्ष्मण तातुराम वाघमारे (वय ३०, दोघेही रा. सावरोली, खोपोली, रायगड) असे अपघातात मृत्यू झालेल्या वीटभट्टी कामगारांची नावे आहेत. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपक आणि लक्ष्मण हे दोघे सख्खे साडू लोणावळ्याजवळील देवघर येथील एका वीटभट्टीवर वीटभट्टी कामगार म्हणून काम करत होते. ते रविवारी काही कामानिमित्त त्यांच्या गावाला मोटार सायकलने (क्रमांक एम एच-०६ एएम ६३९५) गेले होते. रविवारी रात्री ते पुन्हा गावाहून देवघरला परत येताना जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यातील रिदम हॉटेलसमोर त्यांच्या मोटारसायकलला एका अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नितेंद्र कदम व शिवा धनगर आणि सरकारी वाहन चालक यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करत रुग्णवाहिकेतून दोघांना नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या घटनेतील दोन्ही मयतांची नावे व पत्ते माहीत नसल्याने पोलिसांनी त्यांच्याकडील मोबाइलच्या माध्यमातून नातेवाईक व ओळखींच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधत नातेवाइकांना या घटनेची माहिती दिली. पोलीस कर्मचारी नितेंद्र कदम यांनी या घटनेची फिर्याद लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दिली असून, या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शकील शेख हे करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडlonavalaलोणावळा