शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शहरातून रोज दोन मुले होतात गायब!

By admin | Updated: March 1, 2015 00:58 IST

आपलं मूल लहान असो किंवा मोठं. आत्ता डोळ्यांसमोर होतं आणि क्षणार्धात बेपत्ता होतं. त्याला कदाचित कारणेही वेगवेगळी असू शकतात.

नम्रता फडणीस/हिनाकौसर खान-पिंजार ल्ल पुणेआपलं मूल लहान असो किंवा मोठं. आत्ता डोळ्यांसमोर होतं आणि क्षणार्धात बेपत्ता होतं. त्याला कदाचित कारणेही वेगवेगळी असू शकतात. मात्र, ही घटना प्रत्येक आई-वडिलांसाठी वेदनादायी असते. एक ना एक दिवस आपले मूल परत येईल या आशेवर ते वर्षानुवर्षे तग धरून असतात आणि वेड्यासारखे आपल्या मुलाचा शोध घेत राहतात. त्यांच्या मदतीला काही समदु:खी किंवा काही मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था धावून येतातही; पण प्रत्येक वेळी हाती काही लागेलच असे नाही. जानेवारीत म्हणजे एका महिन्यातच शहरातील तब्बल ५० मुले हरवल्याचे धक्कादायक वास्तव पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. सध्या व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून मुले गायब होत आहेत अशा आशयाच्या पोस्टर्स, छायाचित्रे, बातम्यांच्या लिंक्स तसेच मुलांना पळवून नेणाऱ्या टोळ्या शहरात सक्रिय झाल्या असल्याने सावधान अशा स्वरूपाच्या पोस्ट सतत फिरत आहेत. कोणतीही शहानिशा न करता आपण त्या पोस्ट फॉरवर्ड करतो. त्यामुळे पालकांमध्ये अधिकच घबराटीचे वातावरण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीद्वारे मुले गायब होण्याची कारणे अनेक असू शकतात याकडे लक्ष वेधण्याबरोबरच समोर आलेल्या आकडेवारीतून त्यातील गंभीरता अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. घटना खरंतर खूप छोटीशी असते. म्हणजे आई किंवा वडिलांकडून मुलांना रागावून बोलले जाते किंवा हट्ट पूर्ण केला नाही म्हणूनही मुलं नाराज होऊन घरातून बाहेर निघून जातात. रागाच्या भरात ही मुले परत घराकडे फिरकत नाहीत. तर काही वेळा लग्नाचे आमिष दाखवून किंवा त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी पाहता काहीतरी सोन्या-चांदीचे आमिष दाखवून त्यांना पळवून नेले जाते. ही झाली एक बाजू. तर दुसरीकडे तस्करीमधून मुलांना विकले जाण्याच्या घटनाही समोर येत आहेत. जानेवारी २०१५ मध्ये विविध कारणांवरून २९ मुली हरविल्या, तर १९ मुले बेपत्ता झाली आहेत. त्यापैकी २५ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. ४गेल्या वर्षातील पोलिसांच्या आकडेवारीनुसार मुलांपेक्षा मुली गायब होण्याचे प्रमाण अधिक आहे. दिवसाला सरासरी दोन मुली व एक मुलगा हरवत आहे. गतवर्षी तब्बल ७५२ मुली व ३८९ मुले हरविली आहेत. यामध्ये केवळ २९५ मुली व १४७ मुले सापडण्यात यश आले आहे. अजूनही ४५७ मुली आणि २४२ मुले बेपत्ता आहेत.४या संदर्भात चाईल्डलाईन संस्थेच्या संचालिका डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे यांच्याकडून मुले गायब होण्याची कारणे जाणून घेण्यात आली. त्यांनी सांगितले की, अनेकदा मुले कुटुंबीयांच्या दबावामुळे घरातून निघून जातात. तर काहीवेळा रागाच्या भरात किंवा हट्ट न पुरविल्यामुळे अथवा परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या भीतीने मुले निघून जातात. ४काही जण राग शांत झाला की परत येतात; पण काही परत येतच नाहीत. वयापेक्षा मोठ्या किंवा समवयस्क मुलांच्या संगतीमुळे मुले वाहवत जातात. याशिवाय एक प्रमुख कारण म्हणजे मुलांची तस्करी. मुलांची एका ठिकाणाहून उचलून दुसऱ्या ठिकाणी विक्री करणे, कामधंद्याला लावणे किंवा भीक मागण्यासाठी वापरणे असे प्रकार घडताना दिसतात. ४मुले हरवण्याचे दूरध्वनी चाईल्डलाईनला आले तर त्याची तत्काळ दखल घेऊन पोलीस व बालकल्याण समितीला मेल पाठविला जातो. तसेच देशभरात २०० शहरांतील चाईल्डलाईनला कळविले जाते. संस्थेच्या संकेतस्थळावर ती माहिती टाकून शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. ४चौदा किंवा पंधरा वर्षाचे वय हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील नाजूक काळ. पण मुलगी म्हणून पालकांकडून त्यांच्यावर अनेक बंधने लादली जातात. त्यामुळे मुलींना लग्न झाले की बंधनातून सुटका होईल असे वाटते, पण हीच धारणा त्यांना विनाशाकडे नेते. मुख्यत्वे ग्रामीण भागातील मुलींना लग्नाचे आमिष दाखवून, सुखाची स्वप्ने दाखवून फसवले जाते. काही वेळा त्यांचा उपभोग घेऊन त्यांना वेश्याव्यवसायासाठी पाठवले जाते. त्यामुळे पालकांनी मुलींशी नेहमीच मैत्रीपूर्ण नाते ठेवायला हवे. ४आजकाल मोबाईलवर अनेक व्हॉट्स अ‍ॅपचे ग्रुप पाहायला मिळतात, ज्याचा उद्देश मेसेज किंवा छायाचित्र फॉरवर्ड करणे इतकाच असतो. सामाजिक भान ठेवून निर्माण झालेले ग्रुप क्वचितच पाहायला मिळतात. ज्यांची मुले हरवली आहेत किंवा गायब झाली आहेत, त्याच पालकांचा मिळून हा ग्रुप तयार करण्यात आला आहे. एका व्यक्तीने मुलाचा शोध घेण्यास खूप मर्यादा आहेत. हे काम जर एकत्रितपणे केले तर मुलाचा शोध लवकर लागू शकेल हीच यामागील भावना आहे. पालकांना मुले शोधण्यासाठी सहकार्य करण्याच्या हेतूने ’ तेरा बच्चा-मेरा बच्चा’ ही मोहीम व्हॉट्स अ‍ॅपवर सुरू करण्यात आली आहे. हरवलेल्या मुलांची छायाचित्रे व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून सगळीकडे पाठविली जातात, यातून अनेक मुलांचा ठावठिकाणा लागला असल्याचे या मोहिमेचे प्रमुख विनोदकुमार जैन यांनी सांगितले. ४मुले बेपत्ता होण्याला घरातील वातावरणही काही प्रमाणात कारणीभूत असते. आई-वडिलांचे मुलांकडे लक्ष नसणे, भांडण-तंटा, सततची चिडचिड या वातावरणाच्या परिणामामुळे मुले घराबाहेर पडतात. तर झोपडपट्टी भागामध्ये परिस्थितीला कंटाळून इतर मुलांच्या संगतीतून मुले निघून जातात. शंभर मुलांमागे १० ते २० मुले हरवण्याचे प्रमाण आहे. यातच सध्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर किंवा व्हॉट्स अ‍ॅपवर ओळखी होऊन, न सांगता फिरणे आणि पार्ट्या करण्याचे प्रमाण मुलांमध्ये वाढले आहे. पैसे घेऊन ही मुले अनेक दिवस घरी परतत नाहीत. पैसे संपले की मुलांना घराची आठवण होते. तोवर आई-वडिलांची अवस्था खूप वाईट झालेली असते. यासाठी पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण मुलं हरवल्याची तक्रार आल्यानंतर सर्वप्रथम आई-वडील, घरची परिस्थिती, राहणीमान, अशी तपासाच्या दिशेने आमची चकं्र फिरतात. मगच त्याची शोधमोहीम सुरू होत असल्याचे सहायक पोलीस अधीक्षक यशवंत म्हस्कूले यांनी सांगितले.अभियांत्रिकी शाखेत असलेला माझा मुलगा दोन वर्षांपूर्वी निघून गेला. तो अद्यापही परत आलाच नाही. त्याचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मिळाला नाही. आजही तो परत येईल याच आशेवर आम्ही आहोत. मुले हरवल्याची केवळ पोलीस तक्रार होते पण पुढे काहीच घडत नाही. त्यामुळे सोशल नेटवर्किंग साईटसचा वापर करून आमचा मुलगा शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत.- डॉ. बेगडे