शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

दोन सख्खे भाऊ झाले पोलीस उपनिरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 8:53 PM

आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोघा भावांनी हडपसर, पुणे येथे एकत्र राहून अभ्यास केला. अभ्यासात सातत्य ठेवल्याने संतोष याला पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले.

ठळक मुद्देअभ्यासात सातत्य, जिद्द, चिकाटीच्या जोरावर परिस्थितीवर यशस्वीरीत्या मात करत यश

पाटेठाण : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत दौंड तालुक्यातील खामगाव (ता. दौंड) गाडमोडी येथील दत्तात्रय अनंता जाधव व संतोष अनंता जाधव या दोघा सख्ख्या भावांनी यश मिळवत समाजातील इतर युवक वर्गासमोर एक चांगला आदर्श निर्माण करुन दिला आहे.खामगाव (ता.दौंड) गाडमोडी चौकानजीक हे भावंड आपल्या कुटुंबासह येथे राहतात. घरची परिस्थिती सामान्य स्वरुपाची आहे.  आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन पोलीस उपनिरीक्षक व्हावे अशी आई-वडिलांची ईच्छा होती. जाधव बंधूंनी हेच स्वप्न उराशी बाळगून प्रामाणिक कष्ट करुन स्वप्न प्रत्यक्ष सत्त्यात उतरल्याने दत्तात्रय आणि संतोष यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.दत्तात्रय याने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. तर संतोषने कला शाखेतून पदवी घेतली आहे. दत्तात्रयने यापूवीर्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यामध्ये त्याची महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळामध्ये कामगार अधिकारी म्हणून निवड झाली होती. परंतू, एवढ्यावर समाधान न मानता आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोघा भावांनी हडपसर, पुणे येथे एकत्र राहून अभ्यास केला. अभ्यासात सातत्य ठेवल्याने संतोष याला पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. तर दत्तात्रय याने तिस-या प्रयत्नात यश मिळवून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. यशाबद्दल आमदार राहुल कुल यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.अभ्यासात सातत्य, जिद्द, चिकाटीच्या जोरावर परिस्थितीवर यशस्वीरीत्या मात करत यश मिळवले असून एवढ्यावर समाधान न मानता पुढे अभ्यास करुन डीवायएसपी किंवा तहसीलदार होण्याची ईच्छा असून केंद्रिय लोकसेवा, राज्यसेवा व इतर स्पर्धा परीक्षा हे साध्य नसून साधन असून स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्ती करायची असेल तर युवकांनी नियोजनपूर्ण अभ्यास, जिद्द, कठोर मेहनतीबरोबरच, धैर्य आवश्यक असल्याचे जाधव बंधूंनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षकपदी यश संपादन केल्याने दोघा भावांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाPoliceपोलिस