दोन दुचाकींच्या धडकेत एक ठार

By Admin | Updated: January 8, 2017 03:21 IST2017-01-08T03:21:35+5:302017-01-08T03:21:35+5:30

जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारगाव मेमाणे ते वाघापूर चौफुला रस्त्यावर दोन दुचाकींच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना घडली.

Two biker shock one killed | दोन दुचाकींच्या धडकेत एक ठार

दोन दुचाकींच्या धडकेत एक ठार

जेजुरी : जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारगाव मेमाणे ते वाघापूर चौफुला रस्त्यावर दोन दुचाकींच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना घडली.
ही घटना शुक्रवारी (दि. ६) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. महेंद्र निवृत्ती पवार (वय ३३, रा. दौंडज, ता. पुरंदर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून त्यांचे भाऊ अविनाश निवृत्ती पवार यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
केली आहे.
जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : महेंद्र पवार एक महिन्यापासून सहजपूर एमआयडीसी येथील एका कंपनीत नोकरीस होते. ते आपल्या दुचाकीवरून (एमएच १२ जेएक्स ९७५९) कामासाठी गावावरून ये-जा करीत होते.
शुक्रवारी (दि. ६) कामावर जात असताना पारगाव मेमाणे ते वाघापूर चौफुला रस्त्यावर महेंद्र पवार यांच्या दुचाकीस बजाज फोर एस मोटारसायकल (एमएच १२ केए ८७७५) या दुचाकीने विरुद्ध दिशेने येत जोरदार धडक दिली.
यामध्ये महेंद्र पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार हनुमंत गार्डी अधिक तपास
करीत आहेत.

Web Title: Two biker shock one killed