गोव्यातील दारू पुण्यात आणून विकणा-या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:38 IST2020-11-22T09:38:19+5:302020-11-22T09:38:19+5:30

गोविंद पुखराज कुमावत (रा. वारजे ) आणि अमित विठ्ठल राऊत (रा. कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गोव्यात ...

Two arrested for smuggling liquor from Goa to Pune | गोव्यातील दारू पुण्यात आणून विकणा-या दोघांना अटक

गोव्यातील दारू पुण्यात आणून विकणा-या दोघांना अटक

गोविंद पुखराज कुमावत (रा. वारजे ) आणि अमित विठ्ठल राऊत (रा. कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

गोव्यात तयार करण्यात आलेली दारू पुण्यात आणून विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दारूवरील लेबल काढून त्यावर जादा दर टाकून विक्री केली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी गोविंदला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अमितच्या मदतीने दारूविक्री केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस निरीक्षक बाळासाहेब बढे, सहायक पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, विलास ढोले, कांबळे, कानवडे, मनोज पवार, भास्कर बुचडे यांच्या पथकाने केली.

Web Title: Two arrested for smuggling liquor from Goa to Pune