प्रवाशांना लुटणार्या दोघांना अटक; एक फरार
By Admin | Updated: July 7, 2014 05:51 IST2014-07-07T05:51:36+5:302014-07-07T05:51:36+5:30
महामार्गावर प्रवाशांना मोटारीत बसवून लुटणार्या दोघांना अटक करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींचा एक साथीदार फरार आहे.

प्रवाशांना लुटणार्या दोघांना अटक; एक फरार
पिंपरी : महामार्गावर प्रवाशांना मोटारीत बसवून लुटणार्या दोघांना अटक करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींचा एक साथीदार फरार आहे.
नितांत गिरीश पवार (वय २३, रा. कृष्णा चौक, सांगवी) व खालिद अहमद शेख (वय ३२, रा. पिंपळे गुरव, सध्या पारगाव, खंडाळा) या दोन आरोपींना अटक केली आहे. तर त्यांचा एक साथीदार सलीम पापा शेळ (रा. काटे पिंपळे) फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ मे रोजी वाकड पुलाजवळ उभे असलेल्या कमलकिशोर ओमप्रकाश मालवी (वय ३५, रा. वाकड) यांना मोटारीत बसवून मारहाण करीत त्यांच्याकडील ऐवज चोरट्यांनी लुबाडला होता. हा गुन्हा खालिद याने साथीदाराच्या मदतीने केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्याला खंडाळा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चोरीचा मोबाईल सापडला. त्यानंतर त्याने पवार व सलीम यांच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबूल केले. (प्रतिनिधी)