अडीच लाख भाविकांनी घेतले सोमेश्वराचे दर्शन
By Admin | Updated: August 18, 2014 23:20 IST2014-08-18T23:20:06+5:302014-08-18T23:20:06+5:30
आज श्रवणी सोमवारी सरी कोसळत सोमेश्वर देवस्थान येथे सुमारे अडीच लाख भाविकांनी रांगा लावून स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेतले.

अडीच लाख भाविकांनी घेतले सोमेश्वराचे दर्शन
सोमेश्वरनगर : आज श्रवणी सोमवारी सरी कोसळत सोमेश्वर देवस्थान येथे सुमारे अडीच लाख भाविकांनी रांगा लावून स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेतले. जवळपास दोन किलोमीटरची रांग लागली होती. व्यावसायिक, दुकानदारांची गर्दीने धांदल उडाली.
मध्यरात्री महावितरणचे व्यवस्थापक
संदेश हाके व संगिता हाके यांच्या हस्ते
महाभिषेक तर बारामती आगरप्रमुख
रमाकांत गायकवाड व विद्याप्रतिष्ठान
शिक्षण संकुल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता गायकवाड यांच्या हस्ते महापुजा संपन्न झाली. यावेळी पार पडलेल्या महाआरतीला संभाजी होळकर, रामदास भंडलकर, मोहन भांडवलकर, वैभव भांडवलकर, योगेश मोकाश आदी उपस्थित होते. शुक्रवार, शनिवार, रविवार आणि आज अशा जोडून चार सुट्टी आल्याने गर्दीचा उच्चांक आज झाला. पुणो, कोकण, मुंबई, ठाणो येथील कोळी बांधवांनी कालपासूनच मुक्काम मांडला होता. सोमेश्वर नवसाचे ठिकाण असल्याने लक्झरीद्वारे त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती दर्शविली होती.
पाडेगाव येथील प्रगतशील शेतकरी संभाजी मुगुटराव घाडगे, होळचे प्रगतशील शेतकरी शांताराम आनंदराव होळकर यांनी केली होती.
महावितरण कंपनीने भारनियमनाच्या काळातही अखंड वीजपुरवठा केल्याबद्दल ट्रस्टच्या वतीने अभियंता संतोष पंचरस यांचा तर पोलीस बंदोबस्ताबाबत पोलीस निरीक्षक विलास भोसले, उपनिरीक्षक गजानन गजभारे सन्मान करण्यात आला. देवस्थानने आठ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्याचा आज पाकीटमार पकडताना फायदा झाला. सीसीटीव्हीतील फुटेज तपासून दोघांना पोलिसांनी जेरबंद केले.
देवस्थानला पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे, आमदार अशोक पवार, जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी राजेंद्र घुमे, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, अरुण बोराडे, नानाजी देवकाते, दत्त चव्हाण यांनी भेटी दिल्याचे सचिव मोहन भांडवलकर यांनी सांगितले. तसेच समाधानकारक व्यवसाय होत असल्याने सुनिल भांडवलकर, राजू भांडवलकर, विनोद भांडवलकर आदी दुकानदारांनी सांगितले.