शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात अडीच लाखांचे भेसळयुक्त पनीर जप्त; गुन्हे शाखेच्या युनिटची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 15:20 IST

कोणताही परवाना नसताना बेकायदेशीरपणे सुरु होती विक्री

पुणे : कोणताही परवाना नसताना बेकायदेशीरपणे विक्री होत असताना गुन्हे शाखेच्या युनिट ४च्या पथकाने अडीच लाख रुपयांचे १ हजार ४१० किलो भेसळयुक्त पनीर पकडले. अन्न व औषधे प्रशासनाने हे पनीर जप्त केले असून त्याचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकामधील हवालदार गणेश साळुंके यांना पर्वती येथील विष्णु सोसायटीतील एका दुकानात भेसळयुक्त पनीर विकले जात असल्याची माहिती मिळाली. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे व पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांना त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार, हवालदार गणेश साळुंके, सुनिल पवार, राकेश खुनवे, निलेश शिवतरे, यांचे पथक व अन्न व औषधे प्रशासनाचे निरीक्षक कुलकर्णी, काकडे यांनी या दुकानावर मंगळवारी छापा घातला. या दुकानाला कोणतेही नाव नव्हते. पनीर विक्री करण्यासाठी लागणारा अन्न व औषधे प्रशासनाचा परवाना नव्हता. दुकानामध्ये हरिकृष्ण मुरलीधर शेट्टी हा पनीरची विक्री करीत होता. पनीरची माहिती घेतली असता ते प्रथमदर्शनी दिलेल्या दर्जानुसार आढळून आले नाही. तेव्हा दुकानातील सर्व पनीरचे वजन करण्यात आले. ते १ हजार ४१० किलो इतके असून त्यांची किंमत बाजारभावाप्रमाणे २ लाख ५३ हजार रुपये इतकी आहे. अन्न व औषधे प्रशासनाने हे जप्त केले आहे. त्यातील काही सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले असून उर्वरित शितगृहात सुरक्षित ठेवण्यात आले आहे.या पनीरबाबत अधिक चौकशी केली असता ते पालघरमधील वाडा तालुक्यातून आणले असल्याची माहिती मिळाली. पुढील कारवाई अन्न व औषधे प्रशासन करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागPoliceपोलिस