शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
'नीट' रद्द करून गैरप्रकारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
6
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
7
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
8
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
9
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
10
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
11
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
12
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
13
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
14
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
15
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
16
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
17
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
18
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
19
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
20
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?

२३ जिल्ह्यांत भरली तलाठ्यांची अडीच हजार पदे; खुल्या प्रवर्गासाठी ८४१, तर OBC च्या ५२५ जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 2:39 PM

इतर मागासवर्गीयांच्या ५२५ जागा भरण्यात आल्या आहेत, अशी माहिती तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक तथा प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी दिली....

पुणे : राज्यभरातील महसूल विभागातील तलाठी संवर्गातील २३ जिल्ह्यांमधील २ हजार ५०१ पदांकरिता निवड यादी व प्रतीक्षा यादी मंगळवारी (दि. २३) जाहीर करण्यात आली. ही पदे जिल्हा निवड समितीमार्फत भरण्यात आली असून, प्रवर्गनिहाय सर्वांत जास्त पदे अराखीव अर्थात खुल्या प्रवर्गासाठी ८४१ जागा ठेवण्यात येणार आहेत. तर, इतर मागासवर्गीयांच्या ५२५ जागा भरण्यात आल्या आहेत, अशी माहिती तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक तथा प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी दिली.

राज्यात तलाठी संवर्गातील ४ हजार ६४४ पदे भरण्यासाठी जून २०२३ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर सुधारित मागणीपत्रानुसार पदांची संख्या ४ हजार ७९३ इतकी करण्यात आली. या परीक्षेला राज्यातून १० लाख ४१ हजार जणांनी अर्ज केले. त्यांपैकी ८ लाख ६४ हजार ९६० जणांनी १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत ५७ सत्रांमधून ऑनलाइन परीक्षा दिली. मात्र, पेसा क्षेत्रातील अर्थात आदिवासीबहुल क्षेत्रातील जिल्ह्यांमधील पदभरतीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने राज्यातील १३ जिल्ह्यांमधील पदांबाबत निकाल राखून ठेवण्यात आला आहे. उर्वरित २३ जिल्ह्यांसाठी ६ जानेवारीला प्रथम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यात प्रवर्गनिहाय २ हजार ५०१ पदांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक ८४१ पदे अराखीव अर्थात खुल्या प्रवर्गासाठी देण्यात आली आहेत. त्याखालोखाल ५२५ जागा इतर मागासवर्गीयांसाठी आहेत. एकूण २ हजार ५०१ पदांपैकी ९५ पदे दिव्यांगांसाठी १६ पदे अनाथ उमेदवारांना देण्यात येणार आहेत.

प्रवर्गनिहाय पदांची संख्या

अनुसुचित जाती ३२२

अनुसुचित जमाती १८३

विमुक्त जाती (अ) ८०

भटक्या जमाती (ब) ७३

भटक्या जमाती (क) ९४

भटक्या जमाती (ड) ५७

विशेष मागास प्रवर्ग ४८

इतर मागासवर्ग ५२५

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक २६८

अराखीव ८४१

एकूण २५०१

पदभरती प्रक्रिया अधिक पारदर्शीपणे होण्यासाठी परीक्षेला बसलेला उमेदवार व रुजू होणारा उमेदवार एकच असल्याची खात्री, परीक्षेवेळी घेण्यात आलेल्या बायोमेट्रिक माहितीच्या आधारे करण्यात येणार आहे.

- सरिता नरके, राज्य समन्वयक, तलाठी परीक्षा तथा प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त, पुणे

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड