34 गावांपैकी 2 गावांचा पीएमसीत होणार समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 15:29 IST2017-07-19T15:29:37+5:302017-07-19T15:29:37+5:30
पुणे शहरालगतच्या 34 गावांपैकी फक्त दोन गावांचा पुणे महापालिकेमध्ये समावेश करण्यात येणार आहे.

34 गावांपैकी 2 गावांचा पीएमसीत होणार समावेश
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 19- पुणे शहरालगतच्या 34 गावांपैकी फक्त दोन गावांचा पुणे महापालिकेमध्ये समावेश करण्यात येणार आहे. राज्य सरकारने फक्त उरळी आणि फुरसुंगी देवाची या दोन गावांचा पुणे महापालिकेमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याच्या भोवती असणाऱ्या 34 गावांचा महापालिकेत समावेश करण्यात यावा, यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर म्हणणं मांडताना राज्य सरकारने फक्त दोन गावांचा समेवश करण्याबद्दल अनुकूलता दर्शवली आहे. तर नऊ गावांचा अंशतः समावेश केला जाईल, असं राज्य सरकारने म्हटलं आहे. पण अंशतः म्हणजे काय याबाबत कोणतंही स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आलेलं नाही.
उर्वरित 23 गावांचा समावेश पाण्याची उपलब्धता आणि इतर सुविधांचा विचार करुन पुढील तीन वर्षांमध्ये घेतला जाईल असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. एकंदरीत पुण्याच्या भोवती असणाऱ्या 23 गावांना महापालिकेत येण्यासाठी अजून तीन वर्ष वाट पाहावी लागणार आहे.