शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
5
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
6
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
7
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
8
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
10
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
11
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
12
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
13
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
14
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
15
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
16
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
17
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
18
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
19
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
20
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा

पुण्यात वीस लाखांची रोकड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 09:13 IST

लोकसभा निवडणुकांसाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या असून जागोजागी भरारी पथके आणि यंत्रणा वाहनांची तपासणी करीत आहेत.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकांसाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या असून जागोजागी भरारी पथके आणि यंत्रणा वाहनांची तपासणी करीत आहेत.निवडणूक आयोगाने नेमलेल्या स्थिर स्थावर पथकाने पोलिसांच्या मदतीने तब्बल २० लाख रुपयांची रोकड पुण्यातील मुकुंद नगर भागात पकडली आहे. निवडणुका लागल्यापासून रोकड पकडण्यात आल्याची ही पुण्यातील पहिलीच घटना आहे. 

पुणे - लोकसभा निवडणुकांसाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या असून जागोजागी भरारी पथके आणि यंत्रणा वाहनांची तपासणी करीत आहेत. निवडणूक आयोगाने नेमलेल्या स्थिर स्थावर पथकाने पोलिसांच्या मदतीने तब्बल २० लाख रुपयांची रोकड पुण्यातील मुकुंद नगर भागात पकडली आहे. ही रक्कम जप्त करून स्वारगेट पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली आहे. निवडणुका लागल्यापासून रोकड पकडण्यात आल्याची ही पुण्यातील पहिलीच घटना आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, स्थिर स्थावर पथक क्र. १ चे अधिकारी सचिन प्रकाश पवार, आरोग्य निरीक्षक, पुणे महानगरपालिका तथा इलेक्शन मॅजिस्ट्रेट (एसएसटी क्र. १ ३४ -लोकसभा २१२ पर्वती मतदार संघ) हे त्यांच्या सहकाऱ्यांसह मुकुंद नगर भागातील रांका हॉस्पिटल चौकात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत होते. सध्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नेमलेल्या पाठकांकडून मद्य, पैसे आदी वाटप, साहित्य वाटप आदीच्या अनुषंगाने तपासणी करण्यात येत आहे. शुक्रवारी (12 एप्रिल) पहाटे तीनच्या सुमारास एक मोटार संशयास्पदरित्या येताना दिसली. ही मोटार थांबवित डिकीची तपासणी केली असता गाडीमध्ये २० लाख रुपयांची रोकड मिळून आली. 

पवार यांनी यासंदर्भात भरारी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत देंडगे यांना या पैशांबद्दल माहिती दिली. राजेश रतनचंद ओसवाल, (वय ४९, व्यवसाय - व्यापार, रा. ए ११०३, डीएसके चंद्रदिप, मुकुंद नगर) यांच्या मोटारीमध्ये वीस लाख रुपये आढळून आल्याचे कळविले. ही रोकड पकडल्याचे कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या कार्यवाहीनुसार ही रोख रक्कम स्थिर स्थावर पथकाचे अधिकारी सचिन प्रकाश पवार यांनी जप्ती पंचनामा करून जप्त केली. ही रोकड स्वारगेट पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात जमा करण्यात आली आहे.

मोटार आणि रोकड राकेश रतनचंद ओसवाल (रा. डीएसके चंद्रदीप, मुकुंद नगर) यांची असून ते तेलाचे व्यापारी आहेत. त्यांच्याकडील रक्कम ही दिवसभरातील तसेच काही वार्षिक व्यवहारातील असल्याचे सांगण्यात आले आहे. बँक बंद झाल्याने स्वतः च्या दुकानातून घरी नेत होते. या पैशांबाबत पुरावा घेवुन येथुन पुढील सात दिवसांच्या आत निवडणूक खर्च समन्वय अधिकारी, जिल्हा निवडणुक खर्च सनियंत्रण समिती, जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे अथवा आयकर विभागाच्या संदर्भात सह संचालक, आयकर विभाग(अन्वेषण) यांच्याकडे अपील करण्याच्या सूचना ओसवाल यांना देण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसMONEYपैसाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग