चोवीस वर्षांनी पुन्हा भरली शाळा

By Admin | Updated: May 10, 2017 04:09 IST2017-05-10T04:09:33+5:302017-05-10T04:09:33+5:30

दहावीच्या वर्गात २४ वर्षांपूर्वी शिकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली.

Twenty-four-year-old school filled again | चोवीस वर्षांनी पुन्हा भरली शाळा

चोवीस वर्षांनी पुन्हा भरली शाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : दहावीच्या वर्गात २४ वर्षांपूर्वी शिकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. निमित्त होते देहूतील संत तुकाराम कनिष्ठ महाविद्यालयात १९९३ च्या बॅचमधील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या स्रेहसंमेलनाचे.
या संमेलनाच्या निमित्ताने तब्बल २४ वर्षांनी मित्र-मैत्रिणी देहूत एकत्र जमले. पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर आदी जिल्ह्यांतून विद्यार्थी-विद्यार्थिनी आले होते. अनेकजण वेगवेगळ्या हुद्द्यांवर कार्यरत आहेत.
या स्रेहसंमेलनात तत्कालीन शिक्षकांनी पुन्हा एकदा २४ वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा वर्ग घेतला. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त केले. काहींनी शालेय जीवनातील अनुभव कथन केले, तर काहींनी यशस्वी जीवनाचा प्रवास उलगडला.
या कार्यक्रमात माजी शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन माणिक जाधव, शैलेश चव्हाण, उमेश गाडे, नितीन आगरवाल, अस्मिता चव्हाण, वर्षा कंद, सायरा शेख, पूनम माळी आदींनी केले.
या वेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

Web Title: Twenty-four-year-old school filled again