भोरमध्ये रंगणार चौरंगी लढत
By Admin | Updated: June 28, 2014 23:03 IST2014-06-28T23:03:13+5:302014-06-28T23:03:13+5:30
दोन्ही कॉँग्रेस एकत्र लढणार की यंदाच्या वेळीही राष्ट्रवादी कॉँग्रेसचा छुपा उमेदवार असणार, यावर भोर मतदारसंघाची समीकरणो अवलंबून आहेत.

भोरमध्ये रंगणार चौरंगी लढत
>भोर : दोन्ही कॉँग्रेस एकत्र लढणार की यंदाच्या वेळीही राष्ट्रवादी कॉँग्रेसचा छुपा उमेदवार असणार, यावर भोर मतदारसंघाची समीकरणो अवलंबून आहेत. नव्याने वाढलेले तरुण मतदार व मोदीलाटेचा प्रभाव यामुळे युतीच्या कार्यकत्र्यात उत्साहाचे वातावरण आहे. आघाडीतील समन्वयाच्या अभावामुळे लोकसभा निवडणुकीत घटलेले मताधिक्य आघाडीला धोक्याची घंटा आहे. युतीत उमेदवारीसाठी रस्सीखेच असून आघाडी, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अपक्ष अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
भोर, वेल्हे, मुळशी असे तीन तालुके मिळून हा मतदारसंघ बनला आहे. या तीनही तालुक्यांतील ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात लढतात. आरोप-प्रत्यारोप, वादविवाद होतात. निवडणुकीत वरिष्ठांच्या आदेशानुसार आघाडी करतात. मात्न, कार्यकत्र्याच्या मनातील सल जात नाही आणि निवडणुकीत उलट परिणाम होतो, त्यामुळे नेत्यांचे मनोमिलन, कार्यकत्र्याचे वैर कधीच मिटत नाही.
भोरची जागा कॉँग्रेसकडे आहे. मात्र, 2क्क्9च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोघांनी बंडखोरी केली. कॉँग्रेसमध्येही अंतर्गत गटबाजी होऊन एकाची बंडखोरी झाली. राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराला पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबाही होता, अशी चर्चा होती. दोन बंडखोरांत झालेल्या मतांच्या विभाजनामुळे संग्राम थोपटे यांचा विजय सुकर झाला, अन्यथा वेगळे चित्र दिसले असते. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका बाहेरून आणि आतूनही काय राहते, याकडे लक्ष आहे. याचे कारण म्हणजे जिल्ह्यातील इंदापूर वगळता केवळ भोरचीच जागा कॉँग्रेसच्या वाटय़ाला आहे. या दोन्हीही ठिकाणी राष्ट्रवादीकडून बंडखोरीची परंपरा आहे.
नवीन वाढलेले 42 हजार मतदार व ‘मोदी फॅक्टर’ यामुळे युतीचे कार्यकर्ते उत्साहात आहेत. उमेदवारीसाठी माजी आमदार शरद ढमाले व जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे यांच्यात स्पर्धा आहे. कॉँग्रेसकडून आमदार संग्राम थोपटे हेच एकमेव इच्छुक आहेत. मात्न, राष्ट्रवादीकडे इच्छुकांची भाऊगर्दी आहे. रणजित शिवतरे, विक्रम खुटवड, शांताराम इंगवले, राजेंद्र हगवणो, मानसिंग धुमाळ, रघुनाथ किंद्रे, चंद्रकांत बाठे अशी नावे आहेत. मनसेची फारशी ताकद राहिलेली नाही. विरोधकांची ताकद फारशी नसली तरी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळी आणि ऐनवेळी अपक्षाच्या रूपाने बंडखोरी यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे. (वार्ताहर)