शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

तळेघर जवळ बसला अपघात बारा जखमी, भीमाशंकरवरून येणाऱ्या भाविकांची बस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 00:53 IST

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शन करून परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या मुंबई येथील भाविकांच्या बसला अपघात झाला. त्यामध्ये तिघे गंभीर, तर नऊ जण किरकोळ जखमी झाले.

तळेघर  - श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शन करून परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या मुंबई येथील भाविकांच्या बसला अपघात झाला. त्यामध्ये तिघे गंभीर, तर नऊ जण किरकोळ जखमी झाले. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमरास तळेघर येथील तिटकारेवस्ती येथे घडली.जखमींची नावे अशी: संतोष शाम सुंदर पाटोळे (वय २४), संदेश शामसुंदर पाटोळे (वय २८), ज्योत्स्ना जयसिंग शिर्के (वय ४५) हे गंभीर, तर गौरव भरत पाटोळे (वय १६), तन्वी किशोर बने (वय १२), मिनल मिलिंद सुर्वे (वय ५१), स्नेहल जयसिंग शिर्के (वय १६), ओम पाटोळे (वय ११), वैशाली बाबाजी बने (वय ६०), जयसिंग शिवराम शिर्के (वय ४९), धीरज बाबाजी बन्ने (वय ४३), सुमीत्रा सहदेव आडकर (वय ७०) किरकोळ जखमी आहेत. सर्व राहणार मुंबई विक्रोळी येथील रहिवाशी आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : अंधेरी येथील विशाल ट्रॅव्हल या कंपनीची बस (एमएच ०४ एफके ९२८८) मधून २९ भाविक भीमाशंकर येथे भाविक दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यावर ते परतीच्या प्रवासाला निघाले होते. बस तळेघर हद्दीतील तिटकारेवस्ती येथे आली असताना गाडीचा ब्रेक निकामी झाला.चालकाचा गाडीवरील ताबा सुटला त्यामुळे गाडी विरुद्ध दिशेने वळाली. समोर विद्युत पुरवठा करणारा विजेचा खांब असल्यामुळे चालकाने प्रसंगवधान राखुन बस भातशेतामध्ये घातली. त्यामुळे बस पूर्ण उलटली.अपघातचा अंदाज आल्यामुळे बसमधील प्रवाशी सावध झाले होते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. जखमींना तातडीने घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले, तर तीन जखमीना मंचर येथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे