शेजा-याच्या घरात डोकावणारा सीसी टीव्ही?

By Admin | Updated: November 21, 2014 03:51 IST2014-11-21T03:51:19+5:302014-11-21T03:51:19+5:30

एका प्रथितयश व्यावसायिकाने आपल्या बंगल्याबाहेर लावलेल्या सीसी टीव्हीमुळे शेजारच्यांच्या घर, बेडरूममधील हालचालीही चित्रित होत आहेत

TV shows in the house of Sheja? | शेजा-याच्या घरात डोकावणारा सीसी टीव्ही?

शेजा-याच्या घरात डोकावणारा सीसी टीव्ही?

पुणे : एका प्रथितयश व्यावसायिकाने आपल्या बंगल्याबाहेर लावलेल्या सीसी टीव्हीमुळे शेजारच्यांच्या घर, बेडरूममधील हालचालीही चित्रित होत आहेत. त्यामुळे आपल्या वैयक्तिक आयुष्यावर घाला येत
असून असुरक्षित वाटत असल्याने सीसी टीव्ही केवळ बंगल्याच्या परिसरापुरता मर्यादित राहावा, यासंदर्भात एका महिलेने न्यायालयात धाव घेतली़
यावर न्यायालयाने समर्थ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तपास करून अहवाल सादर करावा, असा आदेश दिला आहे. भवानी पेठ येथे राहत असलेल्या ४२ वर्षीय महिलेने आपल्या
शेजारी राहणाऱ्या व्यावसायिक
पिता-पुत्रांविरूद्ध पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र, त्यावर पोलिसांकडून अपेक्षित दाद न मिळाल्याने या महिलने अ‍ॅड. सुदीप केंजळकर व अ‍ॅड. निखिल निकम यांच्यामार्फत न्यायालयात खासगी खटला दाखल केला आहे.

Web Title: TV shows in the house of Sheja?