शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढेंची वर्णी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 12:42 IST

सत्ता बदलानंतर पुण्यात भाजपला रोखण्याचा डाव

ठळक मुद्दे पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची वर्णी लावण्यात येणार असल्याची जोरदार चर्चानुकतेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीचे सरकार अस्तित्वात राष्ट्रवादीचे ४३ तर काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दहा नगरसेवक मुंढे संचालक असताना पीएमपीएमएलचा गाडा रूळावर आणण्याकरिता प्रयत्न

पुणे : राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता बदल घडल्यानंतर आगामी दोन वर्षांत येऊ घातलेल्या महापालिका निवडणुका लक्षात घेऊन काही बदल केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची वर्णी लावण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. पुण्यात भाजपचा वारू रोखण्याकरिता ही खेळी केली जाणार असल्याचे विरोधी पक्षांकडून सांगितले जात आहे.

पुण्याचे पालकमंत्री कोण होणार यावर पुढील गणिते अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे. नुकतेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीचे सरकार अस्तित्वात आले आहे. एकेकाळी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या महापालिकांसह विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पकड होती. २०१४ सालच्या मोदी लाटेत ही पकड ढिलावत गेली. परंतु, राज्यातील नव्या राजकीय समीकरणांमुळे या दोन्ही शहरांवर पुन्हा पकड घेण्याचा प्रयत्न होणार आहे. पुणे महापालिकेत भाजपचे ९९ नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीचे ४३ तर काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दहा नगरसेवक आहेत. पुण्याच्या पालकमंत्रिपदी अजित पवार यांची नियुक्ती होईल, अशी अटकळ बांधण्यात येत आहे. सरकारकडून महापालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलातील अतिवरिष्ठ पदांवरील अधिकाºयांच्या बदल्या करून तेथे मर्जीतील अधिकाºयांच्या नेमणुका केल्या जाण्याची शक्यता आहे. .....पालिकेचे वर्तमान आयुक्त सौरभ राव हे गेले महिनाभर मसुरी येथे प्रशिक्षणाकरिता गेलेले होते. सोमवारी ते पालिकेत परतले. यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे. त्यांची जानेवारीमध्ये पदोन्नती अपेक्षित आहे. त्यामुळे पदोन्नतीने त्यांची बदली होणार हे नक्की. त्यांच्या जागी प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासह आणखी दोन नावांची चर्चा सुरू आहे. पालिकेतील विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्येही कुजबूज सुरू झाली आहे. 

मुंढे संचालक असताना पीएमपीएमएलचा गाडा रूळावर आणण्याकरिता प्रयत्न केले होते. त्यांची कारकीर्द शिस्तीची ठरली होती. नाशिक महापालिकेतही सर्वाधिक भाजपचेच नगरसेवक त्यांच्याविषयी नाराज होते. त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार केला जात असल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Puneपुणेtukaram mundheतुकाराम मुंढेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका