पोलिसांचा खबरी असल्याने तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 02:42 AM2018-06-11T02:42:47+5:302018-06-11T02:42:47+5:30

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून पाच ते सहा जणांनी एका तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला़ ही घटना हडपसरमधील काळेपडळ येथे शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.

trying to murder the youth | पोलिसांचा खबरी असल्याने तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

पोलिसांचा खबरी असल्याने तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

Next

पुणे - पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून पाच ते सहा जणांनी एका तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला़ ही घटना हडपसरमधील काळेपडळ येथे शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घडली़
विक्की दिलीप दिघे (वय २६, रा़ संकेतविहार, काळेपडळ, हडपसर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे़ वानवडी पोलिसांनी आकाश बालभारती, सनी हिवाळे व त्याच्या पाच साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़
याप्रकरणी किरण चव्हाण (वय २६, रा़ हडपसर) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले, की चव्हाण व त्याचे मित्र राहुल तडवी, तन्वीर शेख, विक्की दिघे हे काळेपडळ येथील श्रीगणेश मोबाईल शॉपीसमोर बोलत थांबले होते़ तेव्हा काही जण मोटारसायकलवरून आले़ त्यातील सनी हिवाळे याने राहुल तडवी याला तू पोलिसांना माझी टीप का देतो व आम्ही फोरव्हीलर फोडली, याची पोलिसांना टिप का दिली, असे म्हणून त्याने सर्वांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली़
आकाश बालभारती याने कंबरेचा कोयता काढून विक्की दिघे याच्या डोक्यात वार करून त्याला गंभीर जखमी केले़ तसेच पोलिसांमध्ये तक्रार दिली, तर जीवे मारण्याची धमकी देऊन तेथे जमाव जमवून लोकांमध्ये दहशत निर्माण केली़ त्यामुळे घाबरून लोक पळून गेले़ तेथील दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद केली़
आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वी त्यांच्यावर असे मारामारीचे गुन्हे दाखल आहेत़ याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्ही़ ए़ पवार अधिक तपास करीत आहेत़
 

Web Title: trying to murder the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.