घर सोडून गेलेल्या वडिलांना परत आणण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:09 IST2021-04-27T04:09:43+5:302021-04-27T04:09:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : घरातील वादातून निघून गेलेल्या वडिलांना आणण्यासाठी गेलेल्या एकावर कुऱ्हाडीच्या मागील बाजूने वार करुन गंभीर ...

घर सोडून गेलेल्या वडिलांना परत आणण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : घरातील वादातून निघून गेलेल्या वडिलांना आणण्यासाठी गेलेल्या एकावर कुऱ्हाडीच्या मागील बाजूने वार करुन गंभीर जखमी करण्यात आले. तसेच कारच्या काचा फोडण्यात आल्या. हा प्रकार विमाननगर येथील संजय पार्क येथे शुक्रवारी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला.
या प्रकरणी हलीमा इसाक कनुल (वय ६५), अरबाज सलीम कनुल, सोहेल सलीम कनुल (सर्व रा. संजय पार्क, विमाननगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी अब्दुलसमद शफिक कनुल (वय २८, रा. स्टार सिटी सोसायटी, कोंढवा) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी हे नातेवाईक आहेत. फिर्यादीचे वडिल हे त्यांचा भाऊ इसाक कनुल यांना पैशांची मदत करत असत. यावरुन त्यांच्या घरात वाद झाला होता. त्यावरून वडील रागावून घरातून निघून गेले होते. त्यांना घरी घेऊन येण्यासाठी फिर्यादीची आई, बहिण व तिचे पती हे कारने विमाननगर येथे गेले होते. फिर्यादीची आई वडिलांना घरी येण्याबाबत विचारत असताना आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात कुऱ्हाडीच्या पाठीमागील बाजूने मारुन खाली पाडले व मारहाण केली. त्यांना सोडविण्यासाठी आई व बहीण मध्ये आल्या असताना त्यांनाही मारहाण केली. त्यांच्या कारच्या काचा फोडण्यात आल्या.