एटीएम फोडण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: April 20, 2015 04:18 IST2015-04-20T04:18:19+5:302015-04-20T04:18:19+5:30

सणसवाडी (ता. शिरूर) येथील शालिमार साडी सेंटर या दुकानाचे शटर तोडून तिजोरीतील एक लाख दहा हजार रुपये चोरून नेले,

Trying to break the ATM | एटीएम फोडण्याचा प्रयत्न

एटीएम फोडण्याचा प्रयत्न

कोरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर) येथील शालिमार साडी सेंटर या दुकानाचे शटर तोडून तिजोरीतील एक लाख दहा हजार रुपये चोरून नेले, तर शेजारीच असणाऱ्या कॉर्पोरेशन बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सणसवाडी (ता. शिरूर) येथील हरिश्चंद्र छगनलाल डांगी यांच्या मालकीच्या शालिमार साडी सेंटरमधून एक लाख दहा हजार रुपयांची चोरी करण्यात आली. दरम्यान, चोरट्यांनी शेजारीच असणाऱ्या कॉर्पोरेशन बँकेचे एटीएमही फोडण्याचा प्रयत्न केला. यात एटीएम मशीनचे नुकसान झाले.
(वार्ताहर)

Web Title: Trying to break the ATM