शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शहर राष्ट्रवादीत प्राण फुंकण्याचे प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 20:07 IST

पक्षाला लागलेली गळती, अंतर्गत गटबाजीमुळे जेरीस आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर संघटनेमध्ये प्राण फुंकण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे८० समाजकारण राजकारण व २० टक्के राजकारण या सूत्राने काम करण्याच्या सूचना

पुणे : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पक्षाला लागलेली गळती, अंतर्गत गटबाजीमुळे जेरीस आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर संघटनेमध्ये प्राण फुंकण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. नव्याने नियुक्त्या करण्यात आलेल्या विविध सेल्सच्या पदाधिकाऱ्यांच्या रॅपिड फायर बैठका सोमवारी पक्षाच्यावतीने घेण्यात आल्या. पक्ष संघटना मजबूत करण्यासोबतच आगामी विधानसभेच्या तयारीच्या अनुषंगाने विविध विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा करण्यात आली. या बैठकांबाबत खासदार अ‍ॅॅड. वंदना चव्हाण, शहराध्यक्ष चेतन तुपे आणि पालिकेचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. अ‍ॅड. चव्हाण म्हणाल्या, नुकतीच पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकाºयांच्या नव्याने नेमणुका करण्यात आल्या आहेत. या सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या दिवसभर विविध बैठका घेण्यात आल्या. लोकांसमोर जाताना पक्के कार्यक्रम घेऊन जाणे तसेच ८० समाजकारण राजकारण व २० टक्के राजकारण या सूत्राने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. निवडणूकीच्या अनुषंगाने विविध सेलना जबाबदाºया वाटून देण्यात आल्या आहेत. महिला सक्षमीकरण, युवती व तरुणींमध्ये मासिक पाळीबाबत आणि सॅनिटरी पॅडच्यावापराबाबत जनजागृती, स्वच्छता, महाविद्यालयीन तरुणांशी संवाद, बेरोजगारी, मुलींचे स्व-संरक्षण, सामाजिक कायार्साठी फॅशन शो, टिकटॉकचा वापर, झोपडपट्ट्यांमधील स्वच्छता आणि आरोग्याचे प्रश्न याविषयी काम करावे अशा सूचना सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे अ‍ॅड. चव्हाण यांनी सांगितले. तर, तुपे म्हणाले, पक्षाच्या या बैठकांना पक्षाचे सर्व माजी महापौर, आजी-माजी खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. पक्ष संघटना मजबूत करणे, विधानसभेच्यादृष्टीने तयारी करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. पक्षाची बूथ लेवलपर्यंतची तयारी झाली असून मतदार संघनिहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. लवकरच मतदारसंघनिहाय कार्यकर्ता मेळावे घेतले जाणार आहेत. आठही मतदार संघांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र काम करणार असल्याचे तुपे म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूकPoliticsराजकारण