शिंदवणे घाटात ट्रक कोसळला
By Admin | Updated: August 13, 2014 04:43 IST2014-08-13T04:43:05+5:302014-08-13T04:43:05+5:30
सासवडहून उरुळी कांचनकडे रासायनिक खते घेऊन निघालेला ट्रक सकाळी ६ वाजता शिंदवणे घाटात उलटला. दोन तासानंतर चालकाची यशस्वी सुटका करण्यात आली

शिंदवणे घाटात ट्रक कोसळला
राजेवाडी : सासवडहून उरुळी कांचनकडे रासायनिक खते घेऊन निघालेला ट्रक सकाळी ६ वाजता शिंदवणे घाटात उलटला. दोन तासानंतर चालकाची यशस्वी सुटका करण्यात आली.
ट्रक क्र . एम.एच. १२ डी. ओ. ७०४८ घाटातील बापदेव मंदिरापासून तीव्र उतारावरून येत असताना चालकाचा ताबा सुटल्याने खालून येणाऱ्या २० फूट खोल रस्त्यावर जोरदार आदळल्याने ट्रकचा चक्काचूर झाला. या अपघातात क्लिनर गंभीर जखमी झाला. रस्त्यावरील स्थानिक प्रवाशांनी त्याला तत्काळ दवाखान्यात हलविले. मात्र, या अपघातात ट्रकचालक अडकला. अपघाताची माहिती कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे यांनी अॅम्ब्युलन्स व दोन क्रेन पाठवून दिले.
दोन तासाने चालकाची सुटका झाली. अॅम्ब्युलन्सने पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. ड्रायव्हरला बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष जगदीश महाडिक, पोलीस पाटील पोपट पाटील यांनी प्रयत्न केले.
वारंवार शिंदवणे घाटात अपघात होत असल्याच्या बातम्या ‘लोकमत’ने सचित्र प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य अशोक कसबे, पुरंदर पंचायत समिती सदस्या गौरी कुंजीर, उरुळी कांचन येथील ग्रामपंचायत सदस्य सुनील कांचन पाटील, शिंदवणचे उपसरपंच गणेश महाडिक, जगदीश महाडिक, तुकाई देवस्थानचे अध्यक्ष कांचन मचाले यांच्यासह उरुळी कांचन, शिंदवणे, वळती, वाघापूर, राजेवाडी परिसरातील नागरिकांनी रास्ता रोकोचा इशारा दिला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी घाटात घाटाचे काम सुरू केले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांना गंभीर घटनांबाबत इशाऱ्याचे निवेदन दिले होते. मात्र, घाटात फक्त रुंदीकरणाचे काम अतिशय मंद गतीने सुरू आहे.