ट्रक-कारची समोरासमोर धडक; पती-पत्नीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:10 IST2021-01-04T04:10:03+5:302021-01-04T04:10:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बाभुळगाव : विठ्ठलवाडी (ता. इंदापूर) येथे ट्रक व कारच्या भीषण अपघातात कारमधील पती-पत्नीचा ...

Truck-car head-on collision; Death of spouse | ट्रक-कारची समोरासमोर धडक; पती-पत्नीचा मृत्यू

ट्रक-कारची समोरासमोर धडक; पती-पत्नीचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

बाभुळगाव

: विठ्ठलवाडी (ता. इंदापूर) येथे ट्रक व कारच्या भीषण अपघातात कारमधील पती-पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी झाली. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे.

पांडुरंग सीताराम ताथवडे (वय ५८) आणि रुक्मिणी पांडुरंग ताथवडे (वय ५० रा, दोघे रा. खडकी, मूळ केंदूर पाबळ,ता. शिरूर) असे अपघातात मृत्यू पावलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. या प्रकरणी नितीन पांडुरंग खिलारे (वय ३५, रा. इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावड्याहून भरधाव वेगाने येणारा ट्रक हा इंदापूरला जात होता. या वेळी विठ्ठलवाडी येथील वळण रस्त्यावरून समोर येणाऱ्या मोटारीला या भरधाव ट्रकने समोरून धडक दिली.

अपघातात कारचा चक्काचूर झाला. तसेच गाडीतील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालक अपघातानंतर फरार झाला. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अजित जाधव हे करत आहेत.

फोटो ओळी : विठ्ठलवाडी येथे अपघात कारचा झालेल्या चक्काचूर

Web Title: Truck-car head-on collision; Death of spouse