शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तुटलेल्या संसारामुळे दुरावलेल्या चिमुरड्यांसाठी तडफड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 03:53 IST

दिवाळीला तरी घरी नेऊ देण्यासाठी आर्त अर्ज; काही दिवसांपुरता तरी ताबा देण्याची मागणी

पुणे : तुटलेल्या संसाराचे दु:ख सहन केले; पण दिवाळीच्या चाहुलीने दुरावलेल्या दिव्यांच्या आठवांनी ते आणखी गहिरे झाले आहे. त्यामुळे तब्बल ६० पालकांनी काही दिवसांपुरता मुलांचा ताबा मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केले आहेत. यामध्ये बहुतांश वडील आहेत.ज्या दांपत्यांचा घटस्फोट झाला आहे किंवा नांदण्यावरून भांडणे होत आहे, त्यांच्या मुलांचा ताबा आई किंवा वडिलांकडे देण्यात येतो. ज्यांच्याकडे मुलांचा ताबा आहे ते पालक आयुष्यातील सुख-दु:खाचे क्षण मुलांबरोबर घालवत असतो. मुले लहान असतील तर शक्यतो त्यांचा ताबा आईकडे देण्यात येतो. अशा परिस्थितीत मुलांच्या वडिलांना त्यांचा ताबा पाहिजे असेल तर त्यांना हिंदू विवाह कायद्यानुसार न्यायालयात अर्ज करण्याची मुभा आहे.आईदेखील अशा प्रकारचा अर्ज करू शकते. या कायद्यांतर्गत दिवाळीच्या सुटीसाठी काही दिवस मुलांचा ताबा मिळावा, यासाठी तब्बल ६० आई-वडिलांनी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला आहे. मुलांना किती दिवस सुटी आहे, त्यांची आई किंवा वडिलांकडे जाण्याची इच्छा आहे का?, ज्याला ताबा देण्यात येणार आहे ती व्यक्ती त्यांचा सांभाळ करू शकते का? मुलांसाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ आहे का? ताबा दिल्यानंतर मुलांच्या जिवाला काही धोका तर नाही ना? या बाबींचा विचार करून न्यायालयात ठराविक काळासाठी ताबा देण्याचा निर्णय देत असते. त्यामुळे दरवर्षी दिवाळीच्या पूर्वी पालक न्यायालयात अर्ज करतात, अशी माहिती न्यायालय प्रशासनाकडून देण्यात आली.आईवडिलांचा घटस्फोटाचा खटला सुरू असेल किंवा घटस्फोट झाला असेल तर मुले एका पालकाकडे राहत असतात. अशा परिस्थितीत त्यांना आई-वडिलांचा एकत्र सहवास लाभणे कठीण असते. कधी-कधी तर मुलांचीदेखील इच्छा असते की, त्यांनी आपल्या आईला किंवा वडिलांना भेटावे. मात्र, आई वडिलांच्या वादामुळे त्यांना कोणातरी एकाकडेच थांबावे लागते. अशा पालक व मुलांची भेट व्हावी, म्हणून कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. ताबा मिळाल्यानंतर मुले २४ तास आई किंवा वडिलांच्या सहवासात असतात.ताब्यात असताना मुलांना काही होणार नाही, याची मात्र त्यांना काळजी घ्यावी लागते. ताब्यात असताना त्यांना काही झाले तर दिलेली मुदत त्वरित रद्द करण्यात येते. काही प्रकरणांमध्ये तर आई किंवा वडिलांना त्यानंतर कधीच ताबा देण्यात आलेला नाही, अशी माहिती अ‍ॅड. माधवी परदेशी यांनी दिली.समेट घडविण्याचा प्रयत्न...घटस्फोटाचा दावा दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये देखील मुलांचा ताबा मागितला जातो. अशा वेळी आई किंवा वडिलांना मुले राहत असलेल्या घरात जाऊन त्यांना भेटण्याचे आदेश देण्यात येतात. काही प्रकरणांत ते बगिच्यात देखील भेटू शकतात. मात्र सध्या जी व्यक्ती त्यांना सांभाळत आहे त्याने तेथे उपस्थित राहणे ही गरजेची अट आदेशात ठेवण्यात येते. त्यामुळे मुलांच्या निमित्ताने आई-वडीलदेखील भेटतात. अशा वेळी मुलांच्या भविष्याचा विचार करीत त्यांच्यातील वाद मिटण्याची शक्यता आहे, असे अ‍ॅड. ज्योती जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Divorceघटस्फोटmarriageलग्नrelationshipरिलेशनशिप