शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात तिहेरी हत्याकांड: प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेह जाळले पण एका धाग्यावरून गूढ उकललं

By किरण शिंदे | Updated: June 7, 2025 18:31 IST

- तीन खून करून फरार झालेल्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अतिशय शिताफीने अटक केली आहे.

रांजणगाव (ता. शिरूर) - पुणे जिल्ह्यातील रांजणगाव खंडाळे (ता. शिरूर) येथे रविवारी सकाळी घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. एका २५ वर्षीय तरुणी आणि दोन चिमुकल्या मुलांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या तीनही मृतांना जिवंत जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.अशात आज पुणे ग्रामीण जिल्हा पोलिसांनी एका अत्यंत गूढ हत्याकांडाचा छडा लावत मोठी कामगिरी केली आहे. तीन खून करून फरार झालेल्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अतिशय शिताफीने अटक केली आहे. रांजणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटनेचा उलगडा करत पोलिसांनी आरोपीसह गुन्ह्याचे धागेदोरे सुस्पष्ट केले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, २७ मे २०२५ रोजी रांजणगाव एमआयडीसी परिसरात असलेल्या एका शेताच्या हद्दीत एका महिलेसह दोन मुलांचे अर्धवट जळालेले मृतदेह आढळून आले होते. या भीषण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग मिळाला.यातील मयत महिलेच्या उजव्या हातावर ‘जय भीम’ असा टॅटू आढळून आल्याने पोलिसांना तपासात महत्त्वाचा धागा सापडला आहे. पोलिसांनी मृत महिला आणि दोन्ही मुलांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन, व साक्षीदारांचे जबाब घेण्याचे काम हाती घेतले. यामध्ये मृत महिलेचे नाव स्वाती केशव सोनवणे (वय ३५, रा. वाशी, ता. माजलगाव, जि. बीड) असल्याचे निष्पन्न झाले. स्वाती ही बीड जिल्ह्यातील असून तिच्या दोन मुली – स्वराली (वय २ वर्षे) आणि विराज (वय ८ वर्षे) यांच्यासह ती पुण्यात आली होती. पोलिस तपासात उघड झाले की, स्वाती आणि आरोपी गोरख पोपट बांगरे (रा. शिरूर तालुका) यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात सतत वाद होत होते.अधिकच्या माहितीनुसार, स्वाती हिचा खून केल्यावर तिच्या मुलांनाही गोरखने ठार मारले आणि तिघांचेही मृतदेह दुर्गम भागात टाकून दिले. त्यानंतर आरोपी गोरखने घटनास्थळी पेटवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या बारकाईने केलेल्या तपासामुळे या गुन्ह्याचा छडा लागला.गोरख बांगरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अंबादास साळुंके, सहाय्यक फौजदार गुलाबराव निमसे, बिट अंमलदार फुलराव यांच्या सहकार्याने करण्यात आला. दरम्यान, गोरख पोपट बांगरे याने स्वातीसोबतचा वाद विकोपाला गेला आणि संशयाच्या भरात त्याने इतका टोकाचा निर्णय घेतला. पोलिस तपासात पुढे उघड झाले की, घटनेनंतर आरोपीने आपल्या घरात कोणालाही याबाबत माहिती दिली नव्हती आणि तो शांतपणे वावरत होता.तत्पूर्वी,पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या प्रभावी नेतृत्वात पुणे ग्रामीण पोलिसांनी या अत्यंत क्लिष्ट खुनाच्या घटनेचा पर्दाफाश केला. पुणे ग्रामीण पोलिस दलाने दाखवलेली तत्परता आणि सखोल तपासामुळे एक धक्कादायक गुन्हा उघडकीस आला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी