शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘लाच लुचपत’ची एकाच दिवशी तिहेरी कारवाई; तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांसह वकील, सहकार अधिकारी जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 19:24 IST

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच दिवशी तिहेरी कारवाई केली आहे...

पुणे : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच दिवशी तिहेरी कारवाई केली आहे. तळेगाव दाभाडे येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी, उद्यान पर्यवेक्षक यांना ९ लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर शिरुरमधील सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील सहकार अधिकार्‍यास १५ हजारांची लाच घेताना पकडले. तसेच कौटुंबिक न्यायालयातील खटल्यात १० हजारांची लाच घेताना एका वकिलाला सापळा रचून रंगेहाथ पकडले. 

मुख्याधिकारी शाम लक्ष्मणराव पोशेट्टी (वय ४४, रा. खारघर, नवी मुंबई) आणि उद्यान पर्यवेक्षक विशाल अंकुश मिंड (वय ३३, रा. अथेना सोसायटी, तळेगाव दाभाडे) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार यांच्या कंपनीस तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत काम मिळाले होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर चार कामाची बिलांची रक्कम काढण्यासाठी विशाल मिंड याने ९ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्याला मुख्याधिकारी शाम पोशेट्टी यांनी सहमती दर्शवून लाच मागण्यास सहाय्य केले. या प्रकरणात ५ ते ६ वेळा पडताळणी करण्यात आली. मात्र, सापळा कारवाई होऊ शकली नाही. लाचेची मागणी करण्यात आली असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्याधिकारी शाम पोशेट्टी याला ताब्यात घेण्यात आले आहे.

दुसर्‍या कारवाईत १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहकार अधिकारी शिवाजी महादु गव्हाणे (वय ५६, सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय) याला रंगेहाथ पकडण्यात आले. तक्रारदार यांचे सावकारी परवाना नुतनीकरणासाठी २० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी करताना गव्हाणे याने १५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार तक्रारदाराकडून १५ हजार रुपये स्वीकारताना शिवाजी गव्हाणे याला पकडण्यात आले. 

तिसर्‍या कारवाईत एका वकिलाला १० हजार रुपये लाच घेताना सापळा रचून पकडण्यात आले. हरिकिशन श्रीरामजी सोनी (वय ५७) असे या वकिलाचे नाव आहे.

तक्रारदार महिलेचा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा सुरु आहे. या खटल्यात शासनाने सोनी याची वकील म्हणून नेमणूक केली होती. त्यात सोनी याने तक्रारदार महिलेकडे २० हजार रुपयांची लाच मागितली. महिलेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्याची पडताळणी करताना तडजोडीअंती सोनी याने १० हजार रुपये लाच घेण्यास अनुमती दर्शविली. त्यानुसार सापळा रचून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हरिकिशन सोनी याला तक्रारदाराकडून १० हजार रुपये लाच घेताना पकडले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीCorruptionभ्रष्टाचारAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागadvocateवकिलArrestअटक