नगर- कल्याण महामार्गावर तिहेरी अपघात, 8 ठार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 05:24 AM2023-12-18T05:24:32+5:302023-12-18T05:24:51+5:30

मृतांमध्ये दोन मुले, एक महिला आणि पाच पुरुषांचा समावेश असल्याचे  प्राथमिक माहितीतुन समोर आले आहे.

Triple accident on Nagar-Kalyan highway, 8 killed | नगर- कल्याण महामार्गावर तिहेरी अपघात, 8 ठार 

नगर- कल्याण महामार्गावर तिहेरी अपघात, 8 ठार 

उदापुर: नगर - कल्याण महामार्गावर डिंगोरे ( ता. जुन्नर) गावच्या नजीक पिकअप, रिक्षा आणि ट्रक यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात 8 जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडला आहे. मृतांमध्ये दोन मुले, एक महिला आणि पाच पुरुषांचा समावेश असल्याचे  प्राथमिक माहितीतुन समोर आले आहे.

याबाबत पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, रविवारी रात्री जुन्नर  तालुक्यातील डिंगोरे गावा जवळील अंजीराची बाग येथे ट्रक , टेम्पो आणि रिक्षा यांचा अपघात झाला. यात पिकअप आणि रिक्षामधील आठ जणांचा जागीच मृत्यू झाला.पिकअप ओतूरवरून कल्याणकडे तर  रिक्षा आणि ट्रक ओतूरकडे येत असल्याचे समजते. दरम्यान मृत्तांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थ , पोलीस यांचे मदतकार्य सुरू असून मयतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे .

Read in English

Web Title: Triple accident on Nagar-Kalyan highway, 8 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात