शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

पूर्व वैमनस्येतून गुन्हेगाराला जीवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 5:21 PM

पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून चौघांनी एका गुन्हेगारावर धारधार शस्त्राने वार करून त्याचा खुन करण्याचा प्रयत्न केला़.

ठळक मुद्देयाप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चौघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

पुणे : पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून चौघांनी एका गुन्हेगारावर धारधार शस्त्राने वार करून त्याचा खुन करण्याचा प्रयत्न केला़. ही घटना गुरुवारी (२० सप्टेंबर) रात्री साडेदहा वाजता गुलटेकडी कॅनलजवळ असलेल्या भारती विलास मित्र मंडळाजवळ घडली़.     भक्तीसिंग दीपकसिंग दुधानी (वय २२, रा़ डायस प्लॉट, गुलटेकडी) असे जखमी झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे़. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी ज्योन्टी ऊर्फ अनिल कांबळे, सागर गायकवाड, बबलु गायकवाड, तानाजी गायकवाड (सर्व रा़  डायसप्लॉट, गुलटेकडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़.याप्रकरणी कन्हैयासिंग पापुलसिंग टाक (वय २०, रा़ डायस प्लॉट, गुलटेकडी) याने स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुधानी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अल्पवयीन असतानाच खुनाचा गुन्हा दाखल झाला होता़. तो दरोडा टाकल्याच्या गुन्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात होता़.  नुकताच तो सुटून बाहेर आला होता़.  त्याचे वडील व इतर नातेवाईकांवरही अनेक गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे़.         भारती विलास मित्र मंडळाच्या गणपती विसर्जनासाठी टाक हे व त्यांचे मित्र मांडव बांधत होते़. त्यावेळी दुधानी हा महापालिकेच्या बेंचवर बसला होता़. त्याच्या बाजूच्या गल्लीत राहणारे अनिल कांबळे व इतर तिघे रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तेथे आले़.  त्यांच्यात व दुधानी यांच्यात पूर्वी भांडणे झाले होती़.  या भांडणाचा राग मनात धरून व तो एकटा बसलेला पाहून चौघांनीही त्याच्यावर धारधार शस्त्राने डोक्यात व हातावर सपासप वार केले़. त्यात भक्तीसिंग जखमी होऊन जागीच कोसळला़. त्यानंतर चौघेही पळून गेले़ नागरिकांनी भक्तीसिंग याला रुग्णालयात दाखल केले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत़. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चौघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़. पोलीस उपनिरीक्षक आर. सी. उसगावकर पुढील तपास करीत आहेत़.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPuneपुणे