शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रणेला हाताशी धरून आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींच्या नावे; गृहमंत्र्यांच्या तालुक्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 13:41 IST

तक्रारही करता येईना...

सुषमा नेहरकर- शिंदे

पुणे : जिल्ह्यातील आंबेगाव आणि खेड तालुक्यातील अनुसुचित क्षेत्रातील (पेसा) काही गावातील आदिवासींच्या जमिनी प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरुन बिगर आदिवासींचे नावावर करण्यात आलेल्या आहेत. पेसा कायद्यानुसार बिगर आदिवासींच्या नावावर झालेल्या जमिनी पुन्हा मुळ आदिवासींच्या नावावर करा असे ठराव ग्रामसभेत करण्यात आले आहेत. या संदर्भात महसूल विभागात पाठपुरावा करून देखील गरीब व सर्वसामान्य आदिवासींना कोणीही उभे करत नसल्याचे समोर आले आहे. 

सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (radhakrushna patil) यांनी आदिवासींच्या जमिन खरेदीत मोठा गोंधळ असल्याचे स्पष्ट केले. याचाच एक भाग म्हणजे पुणे जिल्ह्यातील गृह मंत्र्यांच्याच आंबेगाव तालुक्यात मोठ्याप्रमाणात पेसा ग्रामपंचायतींमध्ये अत्यंत कवडीमोल किमतीला या आदिवासींच्या जमिनी मुंबई, पुण्यातील बड्या इनव्हेस्टरने लाटल्या आहेत. कायद्यानुसार आदिवासी लोकांच्या जमिनी बिगर आदिवासी लोकांच्या नावावर होत नाहीत. परंतु महसूल प्रशासनातील अधिका-यांना हाताशी धरून मोठ्याप्रमाणात असे प्रकार करण्यात आले आहेत. पेसा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ठराव करून या जमिनी पुन्हा मुळ मालकांच्या नावावर करण्याची मागणी करण्यात आली आहे.पण या पेसा ग्रामपंचायतींच्या ठरावाला महसूल प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (dilip walse patil) यांच्या आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक पेसा ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतींमध्ये मोठ्याप्रमाणात आदिवासीच्या जमिनी बिगर आदिवासींच्या नावे झाल्या आहेत. आंबेगाव तालुक्यातील डोण, कोंढरे, न्हावडे, तिरपाड, नानवडे, पिंपरगणे, आहुपे, आसणे, कुशिरे बु., सावळे या पेसा गावांतील सुमारे 30 पेक्षा अधिक आदिवासी शेतक-यांच्या जमिनी बिगर आदिवासी लोकांनी कवडीमोल किमतीत खरेदी केल्या आहेत. 

टॅग्स :PuneपुणेDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील