शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

पुण्यातील तरुणीची जबरदस्त कामगिरी; कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे मोबाईल ॲप केले विकसित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 12:02 IST

प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावशाली पाऊल

पुणे : आपण दररोज विनाकारण कार्बन तयार करतो आणि तो हवेत जाऊन प्रदूषणात भर घालतो. पण आता आपण आपले कार्बन कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. त्यासाठी एक मोफत ॲप पुण्यातील तरूणीने केले असून, ते डाऊनलोड केल्यास तुम्ही दररोज किती कार्बन कमी करू शकता, ते त्यात दिसून येईल. परिणामी प्रदूषण कमी करण्यासाठी मदत होणार आहे.

प्राची शेवगावकर या तरूणीने ‘cool the globe हे ॲप तयार केले आहे. प्ले स्टोअरमध्ये हे कोणालाही डाऊनलोड करता येईल आणि त्याचा वापर करता येईल. ती या विषयी म्हणाली,‘‘ मी जागृती यात्रेत सहभागी झाले होते. तेव्हा सोनम वांगचूक यांच्याशी ओळख झाली. त्यांच्या व्यक्तिमत्वाने मला प्रभावीत केले. त्यानंतर मी निसर्ग संवर्धनासाठी काही तरी करू शकेन का ? यावर विचार करू लागले. मला याबाबत काहीच माहिती नव्हते. मग मी माझ्या बाबांना याविषयी विचारले. त्यांनी सोपा मार्ग सांगितला. तु स्वत: कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न कर. मग मी ठरवलं की, काय केले म्हणजे मी कार्बन उत्सर्जन कमी करू शकेन. मी जर स्वत:च्या वाहनापेक्षा सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला, मांसाहार सोडला तर किती कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होईल. त्याबाबत मग मी आणि माझ्या बाबाने हे ॲप तयार केले. यातून सामान्य माणूस सुध्दा हवामान बदलावर स्वत:चे योगदान देऊ शकतो.’’

कसे थांबवाल कार्बन उत्सर्जन ?जर मी दहा किलोमीटर वाहनाऐवजी सायकलने प्रवास केला, तर मी २.३ किलो कार्बन वातावरणात जाण्यापासून वाचविला. जर मी दोन तास टीव्ही पाहिला नाही, तर मी ०.१२ किलो कार्बन उत्सर्जन होण्यापासून  वाचविले. मला मांसाहार आवडतो, पण महिनाभर मी ते खाल्ले नाही, तर महिन्याला २० किलो कार्बन उत्सर्जन थांबविले, असे प्राची म्हणाली.  

नागरिकांनी अधिकाधिक वापर करावातीन वर्षे ‘cool the globe’ या ॲपवर काम केले. हा प्रकल्प पूर्ण झाला असला, तरी त्याचे काम आता सुरू होणार आहे. ज्यांना हवामान बदलावर काम करायचे आहे, त्यांनी याचा वापर करून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. आपले लहान-लहान बदलच हवामान बदलावर परिणामकारक ठरणार आहेत, असे प्राची म्हणाली. 

टॅग्स :PuneपुणेMobileमोबाइलpollutionप्रदूषण