शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

तब्बल तीस तास रखडले सिंहगड एक्सेप्रेसमधील प्रवासी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 21:33 IST

मुंबईतून शनिवारी सायंकाळी ५.५० वाजता निघणारी सिंहगड एक्सप्रेस रविवारी रात्री उशिरापर्यंत पुण्यात पोहचली नाही, त्यामुळे तब्बल 30 तासाहून अधिक काळ प्रवाशांना रेल्वेत अडकून पडावे लागले.

पुणे : सिंहगड एक्सप्रेसने अनेकदा मुंबई ते पुण्यादरम्यान ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी शनिवार आणि रविवार हे दोन दिवस अभुतपुर्व त्रासाचे ठरले. यापुर्वी या प्रवाशांना कधीच अशा मनस्तापाला सामोरे जावे लागले नव्हते. मुंबईतून शनिवारी सायंकाळी ५.५० वाजता निघणारी सिंहगड एक्सप्रेस रविवारी रात्री उशिरापर्यंत पुण्यात पोहचली नव्हती. पावसामुळे ही गाडी कल्याणमधून कसारा मार्गे वळविण्यात आली, पण हा मार्गही बंद झाल्याने प्रवासी मधेच अडकून पडले. परिणामी, तब्बल ३० तासांनंतरही ही गाडी पुण्यात पोहचू शकली नाही. 

मुसळधार पावसामुळे शनिवारी मुंबईतील रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. पण मुंबई ते पुणे दरम्यानची वाहतुक धीम्या गतीने सुरू होती. डेक्कन क्वीन व सिंहगड एक्सप्रेस या गाड्या नियमित वेळेपेक्षा तीन ते साडे तीन तास विलंबाने निघाल्या. डेक्कन क्वीन कर्जतजवळील भिवपुरी येथे आल्यानंतर मंकी हिल परिसरात रेल्वेमार्गावर दरड कोसळली. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास प्रवाशांना ही माहिती देण्यात आली. ही गाडी माघारी वळवून पहाटे ३ वाजता कल्याण स्थानकात आली. प्रवाशांना सिंहगड एक्सप्रेसमध्ये हलविण्यात आले. ही गाडी ३.४५ वाजता कसारामार्गे वळविण्यात आली. पण पहाटे ५.३० च्या सुमारास उंबराली स्थानकाजवळ थांबविण्यात आली. तेव्हापासून दुपारी ४ वाजेपर्यंत ही गाडी तिथेच होती, अशी माहिती सिंहगडमधील प्रवासी शाहरूख इराणी यांनी दिली. 

कसारा घाटामध्ये दरड कोसळल्याने हा मार्गही रात्रीपासून बंद होता. त्यामुळे सिंहगड एक्सप्रेस पुढे जाऊ शकली नाही. या स्थितीमुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. गाडीतील प्रवासी परेश पडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, उंबराली स्थानकात जवळपास १३ तास गाडी उभी होती. प्रवाशांकडील पाणी व खाण्याचे पदार्थही नाहीत. अनेकांना औषधे घ्यायची होती, पण काही खायला नसल्याने त्यांना घेता आले नाही. रेल्वेकडून काही माहिती मिळाली नाही. आम्ही दुपारी सुमारास गाडीतून उतरून तिथेच खाण्याची व्यवस्था होतेय ते पाहिले. तर दुपारी ३ वाजता बस शोधल्या. तेथील एका नगरसेवकाने तीन बसची व्यवस्था केली. त्यासाठी प्रत्येकाने ३०० रुपये दिले. ही बस कल्याण, पनवेल मार्गे पुण्याकडे निघाली आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, ही गाडी पहाटे २ वाजता पुण्यात दाखल होईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.

दरड काेसळल्याने घाट बंद दरड कोसळल्याने कसारा घाट बंद होता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दरड हटवून रेल्वेगाड्यांचे संचलन सुरू करण्यात आले. सुमारास १२ तास प्रवासी एकाच जागेवर होते. प्रवाशांना पाणी व खाण्याची व्यवस्था करण्यात आली.- रेल्वे प्रशासन

पहिल्यांदाच कसारामागे वळविलीमुंबईहून पुण्याकडे धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, प्रगती व इतर इंटरसिटी एक्सप्रेल यापुर्वी कधीही कसारामार्गे सोडण्यात आल्या नाहीत. घाटामध्ये दरड कोसळल्यास या गाड्या रद्द केल्या जातात. पण शनिवारी पहिल्यांदाच सिंहगड एक्सप्रेसला कसारामार्गे वळविण्यात आले. पुण्याकडे येण्यासाठी हा मार्ग खुप दुरचा आहे. प्रवाशांची कल्याणमधूनच बसद्वारे पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित होते. हे प्रवासी रविवारी सकाळी पुण्यात पोहचले असते. पण रेल्वेकडून प्रवाशांचा विचार करण्यात आला नाही. केवळ ही गाडी पुण्यात कशीही पोहचविण्यासाठी प्रयत्न केले गेले.- हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप

टॅग्स :railwayरेल्वेPuneपुणेMumbaiमुंबईRainपाऊस