शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महिला प्रवाशांचा प्रवास अधिक सुखाचा : ६६ तेजस्विनी बस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 21:15 IST

तेजस्विनी बसला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी ई-बसचे लोकार्पण ; या बस मंगळवारी प्रत्यक्ष मार्गावर येणार

पुणे : दररोज बसने प्रवास करणाºया महिला प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) खास महिलांसाठी असलेल्या तेजस्विनी बसची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मार्गावर ३३ बस धावत असून त्याला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्य शासनाने दिलेल्या दहा कोटी रुपये अनुदानातून पीएमपी प्रशासनाने महिला प्रवाशांसाठी ३३ मिडी बस खरेदी केल्या आहेत. त्यापैकी सहा बस व २५ इलेक्ट्रिक बसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण करण्यात आले. मागील वर्षी जागतिक महिला दिनानिमित्त पीएमपीने तेजस्विनी बस सुरू केल्या आहेत. यावेळी ताफ्यात नव्याने आलेल्या ३३ मिडी बस त्यासाठी वापरण्यात येत आहेत. तेजस्विनी बससाठी राज्य शासनाने दिलेल्या अनुदानातून ३३ बस खरेदीची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. त्यातील ६ बस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. उर्वरीत बसही फेब्रुवारी अखेरपर्यंत येतील. याविषयी बोलताना पीएमपीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे म्हणाल्या, तेजस्विनी बसला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे नवीन तेजस्विनी बस येणार असल्या तरी यापुर्वी मार्गावर असलेल्या बसही सुरू ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे एकुण बसची संख्या ६६ होणार आहे. तसेच या बस आरामदायी असून महिलांचा आणखी प्रतिसाद वाढेल. केवळ महिलांसाठी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर बस दिल्या जाणार आहेत. नवीन बस चालविण्यासाठी सोप्या आहेत. त्यामुळे भविष्यात या बसवर महिला चालक देण्याबाबत विचार केला जाईल. ------------ई-बस धावणार मंगळवारपासूनमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी ई-बसचे लोकार्पण झाले असले तरी या बस मंगळवारी प्रत्यक्ष मार्गावर येणार आहेत. सध्या केवळ १० बसची नोंदणी झाली आहे. त्यामुळे मंगळवारपासून या दहा बसचे सातपैकी काही मार्गांसाठी नियोजन केले जाईल. उर्वरीत बस नोंदणी झाल्यानंतर टप्प्याटप्याने मार्गावर सोडल्या जातील. या बसचा तिकीट दर इतर बसप्रमाणेच ठेवण्यात येणार असल्याने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असे नयना गुंडे यांनी सांगितले.-------- 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडेWomenमहिला