पश्चिम महाराष्ट्रातील अपरिचित पर्यटन स्थळांचा प्रवास उलगडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:09 IST2021-07-15T04:09:19+5:302021-07-15T04:09:19+5:30

पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील अपरिचित पर्यटन स्थळे, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व, तसेच भौगोलिक वेगळेपण उलगडणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन ...

Travel to unfamiliar tourist destinations in Western Maharashtra will unfold | पश्चिम महाराष्ट्रातील अपरिचित पर्यटन स्थळांचा प्रवास उलगडणार

पश्चिम महाराष्ट्रातील अपरिचित पर्यटन स्थळांचा प्रवास उलगडणार

पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील अपरिचित पर्यटन स्थळे, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व, तसेच भौगोलिक वेगळेपण उलगडणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे. पर्यटन स्थळावरील स्थानिक जाणकार, इतिहासतज्ज्ञ तसेच पर्यटन क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञ याबाबत पर्यटकांना मार्गदर्शन करणार आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळांचे १४ विभाग पाडण्यात आले आहेत. दर आठवड्याला एका विभागातील विविध पर्यटन स्थळांची यामध्ये माहिती देण्यात येणार आहे. १४ जुलैपासून दर बुधवारी दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी महाराष्ट्र पर्यटनच्या अधिकृत फेसबुक पेजवर लाईव्ह महाराष्ट्र सेशनमधून यात पर्यटकांना सहभागी होता येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, सासवड, भिगवण, भुलेश्वर, भोर, पवनानगर, तुंग, तिकोना आणि भीमाशंकर परिसर, सातारा जिल्ह्यातील वाई, फलटण, लोणंद, शिखर शिंगणापूर, कास, बामणोली, वासोटा व्याघ्र प्रकल्प, औंध, चाफळ, सज्जनगड, कोयनानगरचा परिसर, सांगली जिल्ह्यातील नृसिंहवाडी, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, जोतिबा, रामलिंग गुफा, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, ग्रामीण संस्कृतीबाबत पर्यटकांना माहिती देण्यात येणार आहे.

Web Title: Travel to unfamiliar tourist destinations in Western Maharashtra will unfold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.