कचरा डेपोस विरोध

By Admin | Updated: January 18, 2016 01:15 IST2016-01-18T01:15:14+5:302016-01-18T01:15:14+5:30

करंदी (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या डेपोस विरोध दर्शविलेला आहे. ‘गंगोत्री एनर्जी प्रा. लि.’च्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे

Trash Debas Resistance | कचरा डेपोस विरोध

कचरा डेपोस विरोध

केंदूर : करंदी (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या डेपोस विरोध दर्शविलेला आहे. ‘गंगोत्री एनर्जी प्रा. लि.’च्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. कचरा डेपोच्या करंदी गावाच्या गायरान जागेत सुमारे एक ते दोन एकर जागेवर हा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. परिसरातील सात-आठ गावचा कचरा एकत्र करून यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यापासून वीजनिर्मिती व योग्य दरात खत उपलब्ध करण्यात येणार असल्याने यापासून ग्रामपंचायतीला मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
या कंपनीवर सुमारे पाच व्यक्ती काम करणार असून, गावातील दोन व्यक्तींचा सहभाग म्हणून सरपंच व उपसरपंच यांनाही समाविष्ट करणार आहेत. विविध कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. संबंधित कंपनीनेच योग्य मार्गदर्शन केलेले नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामीण भागात प्रामुख्याने कचरा नियोजन परंपरेनुसार ‘उकिरड्या’मध्येच केला जात असून, यापासून खत निर्माण करून शेतीसाठी प्रामुख्याने वापर केला जात आहे. करंदी गावात प्रामुख्याने कचरा निर्माण होणाऱ्या प्लॅस्टिक, केमिकल, पाचट, हॉस्पिटल अशा जागाच नसल्याने इतर गावचा कचरा आमच्या गावात नकोच, अशीच भूमिका येथील ग्रामस्थांची आहे.

Web Title: Trash Debas Resistance