घरफोड्या करणारे पोलिसांच्या जाळ्यात
By Admin | Updated: January 28, 2017 01:52 IST2017-01-28T01:52:55+5:302017-01-28T01:52:55+5:30
शहराच्या विविध भागांमध्ये घरफोड्या करणाऱ्या चौघांना समर्थ पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून १५ लाखांचे ५० तोळे सोने हस्तगत करण्यात

घरफोड्या करणारे पोलिसांच्या जाळ्यात
पुणे : शहराच्या विविध भागांमध्ये घरफोड्या करणाऱ्या चौघांना समर्थ पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून १५ लाखांचे ५० तोळे सोने हस्तगत करण्यात आल्याची माहिती परिमंडल दोनचे उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.
शरीफ काळे ऊर्फ अमीर अंतनु शिंदे (वय ३०, रा. देहूरोड) असे अटक आरोपीचे नाव आहे, तर त्याचा साथीदार नीलेश अंकुश काळे (वय ३०, रा. देहूरोड) फरार झाला आहे. हे दोघेही सराईत गुन्हेगार असून शिंदेवर २८, तर काळेवर ३२ गुन्हे दाखल आहेत. दिवसा शहरात फिरून कुलूपबंद फ्लॅट फोडण्याची आरोपींची पद्धती आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते व पोलीस उपनिरीक्षक नितीन अतकरे यांचे पथक आरोपींचा शोध घेत असताना सीसीटीव्हीमध्ये एक संशयित दिसला होता. त्यावरून तपास करून देहूरोडमध्ये सापळा लावून आरोपीला अटक केली. आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.