लोणावळ्यात वाहतूककोंडी

By Admin | Updated: August 17, 2015 02:35 IST2015-08-17T02:35:31+5:302015-08-17T02:35:31+5:30

शनिवार व रविवारच्या सुटीला जोडून आलेल्या पतेतीच्या सुटीमुळे लोणावळ्यात शनिवारपासून हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाल्यामुळे शनिवारी सकाळपासून द्रुतगती

Transportists in Lonavala | लोणावळ्यात वाहतूककोंडी

लोणावळ्यात वाहतूककोंडी

लोणावळा : शनिवार व रविवारच्या सुटीला जोडून आलेल्या पतेतीच्या सुटीमुळे लोणावळ्यात शनिवारपासून हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाल्यामुळे शनिवारी सकाळपासून द्रुतगती महामार्गासह लोणावळ्यात प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे़
मुंबईकर, तसेच पुणेकर पर्यटकांनी शनिवारी सकाळपासूनच लोणावळ्याच्या दिशेने आगेकूच केल्यामुळे खंडाळा घाटात तसेच, राष्ट्रीय महामार्गावर सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ द्रुतगती महामार्गावर दरडग्रस्त भाग असलेल्या खंडाळा बोगद्याजवळील मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेच्या तीनही लेन बंद ठेवण्यात आल्या आहे़त. यामुळे पुण्याकडून तीन लेनवरून येणारी वाहतूक येथे एका लेनवर घ्यावी लागते. यामुळे खंडाळा परिसरात प्रचंड वाहतूककोंडी झाली होती़ अखेर ही कोंडी सोडविण्यासाठी मुंबईकडे जाणारी सर्व हलकी वाहने वलवण येथून राष्ट्रीय महामार्गावर वळविण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Transportists in Lonavala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.