शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Pune | खंडोबा यात्रेसाठी आकुर्डीतील वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गांचा वापर करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 20:31 IST

माहीत करून घ्या वाहतुकीतील बदल...

पिंपरी :आकुर्डी येथील खंडोबा मंदिर येथे यात्रोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त बुधवारी (दि. २८) आणि गुरुवारी (दि. २९) आकुर्डी खंडोबामाळ चौक येथे वाहतुकीत बदल केला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

पुणे-मुंबई महामार्गावर आकुर्डी येथील खंडाेबामाळ चौकात खंडोबा मंदिर आहे. येथील यात्रा पंचक्रोशित प्रसिद्ध आहे. या यात्रेसाठी दोन लाखाे भाविक येतात. त्यामुळे मंदिर परिसराम गर्दी होते. भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निगडी वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल केला आहे. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.   

वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे :- थरमॅक्‍स चौकाकडून येणारी वाहतूक ही आर. डी. आगा मार्गाकडून गरवारे कंपनी कंपाऊंडपर्यंत येऊन तेथील टी जंक्शनवरून खंडोबामाळ चौकाकडे न जाता ती डावीकडून परशुराम चौकाकडून मोहननगर, चिंचवड मार्गे इच्छित स्थळी जातील.- परशुराम चौकाकडून येणारी वाहतूक ही खंडोबामाळ चौकाकडे न येता ती परशुराम चौकातून आर. डी. आगा मार्गे गरवारे कंपनी कंपाऊंड पर्यंत येऊन टी जंक्शन वरून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जातील.- चिंचवड, दळवीनगर व आकुर्डी गावठाणातून येणाऱ्या वाहनांना खंडोबामाळ चोकाकडून थरमॅक्‍स चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत असून सदरची वाहने ही टिळक चौक/ शिवाजी चौक बाजूकडे वळून इच्छितस्थळी जातील.- टिळक चौकाकडून येणाऱ्या वाहनांना खंडोबामाळ चौकातून थरमॅक्‍स चौक बाजुकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत असून सदरची वाहने सरळ चिंचवड स्टेशन/दळवीनगर मार्गे इच्छितस्थळी जातील.  

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडakurdiआकुर्डीtraffic policeवाहतूक पोलीस