शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
2
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
3
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
4
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
5
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
6
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
7
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
8
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
9
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
10
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
11
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
12
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
13
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
14
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
15
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
16
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
17
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
18
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

Pune: काॅलेजसमोर थांबल्याने तृतीयपंथीला बिअरच्या बाटलीने मारहाण, दिघीतील घटना

By नारायण बडगुजर | Published: October 31, 2023 4:44 PM

अक्षय हे त्यांच्या तृतीयपंथी मैत्रिणींसोबत रिक्षाच्या प्रतीक्षेत थांबले होते...

पिंपरी : महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर रिक्षाच्या प्रतीक्षेत थांबल्याच्या कारणावरून तीन ते चार जणांनी तृतीयपंथीला बिअरच्या बाटलीने मारून जखमी केले. दिघीतील आळंदी रोड परिसरातील ए. आय. टी. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर रविवारी (दि. २९) रात्री सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली.

अक्षय ऊर्फ जोया हजेरी (२३, रा. येरवडा) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. ३०) दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. माेन्या माने (रा. दिघी) व त्याच्या सोबतच्या तीन अनोळखी इसमांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अक्षय हजेरी हे तृतीयपंथी आहेत. अक्षय हे त्यांच्या तृतीयपंथी मैत्रिणींसोबत रिक्षाच्या प्रतीक्षेत थांबले होते. यावेळी मोन्या व त्याचे साथीदार तिथे आले. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर रिक्षाच्या प्रतीक्षेत थांबल्याच्या कारणावरून चिडून बिअरच्या बाटलीने फिर्यादी अक्षय यांच्या डोक्यात मारून तसेच चाकूने कमरेवर वार करत जखमी केले. हे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तृतीयपंथी मैत्रिणींनादेखील मोन्या आणि त्याच्या सोबतच्या अनोळखी इसमांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीdighiदिघी