‘किन्नर फॅशन फेस्ट’ स्पर्धेला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:52 AM2018-11-29T00:52:09+5:302018-11-29T00:52:52+5:30

स्पर्धेत संपूर्ण भारतातून तृतीयपंथी स्पर्धक सहभागी झाले होते.

transgender Fashion Fest tournament in pune | ‘किन्नर फॅशन फेस्ट’ स्पर्धेला प्रतिसाद

‘किन्नर फॅशन फेस्ट’ स्पर्धेला प्रतिसाद

googlenewsNext

पुणे : पुण्यात प्रथमच तृतीयपंथी समाजासाठी ‘किन्नर फॅशन फेस्ट’ नावाची फॅशन शो स्पर्धा मुंढवा येथील एका हॉटेलमध्ये पार पडली. या स्पर्धेत संपूर्ण भारतातून तृतीयपंथी स्पर्धक सहभागी झाले होते.


याप्रसंगी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक महेश लडकत, राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी, भारतीय कुराश असोसिएशनचे शिवाजीराव साळुंके, अण्णा गुंजाळ, सागर बोधगिरे, अमित कुचेकर, प्रकाश यादव, सुशील जाधव, हितेश शर्मा, मिहीर जोशी उपस्थित होते. त्याचबरोबर तृतीयपंथी समाजासाठी काम करणाऱ्या पन्ना दीदी, चांदणी दीदी, सोनाली दीदी उपस्थित होत्या. स्पर्धेचे परीक्षण मिसेस इंडिया रूपाली सावंत आणि राज गुरू यांनी केले. नील कांबळे, सचिन वाघोडे, प्रशांत काशीद, हरीश कटके आणि दिनेश भोसले यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. नील ग्रुप आॅफ कंपनीजच्या वतीने प्रथमच पुण्यात आयोजित करण्यात आली.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक - समीना अहमद
द्वितीय क्रमांक - सिया कांबळे
तृतीय क्रमांक - मायरा साळुंके
बेस्ट स्माईल - ऐश्वर्या गोरे
बेस्ट पर्सनॅलिटी - सना शेख
फोटोजेनिक - शायनाज शेख
बेस्ट हेअरस्टाइल - तमन्ना शेख
बेस्ट कॉस्च्यूम - नताशा घानवट

Web Title: transgender Fashion Fest tournament in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.