शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

त्यांनी दूरदृष्टीतून लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 01:52 IST

जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक शिवाजीराव काळे यांनी अल्पशिक्षित असताना जुन्नरसारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना उच्चशिक्षित करण्याचे स्वप्न पाहिले.

जुन्नर : जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक शिवाजीराव काळे यांनी अल्पशिक्षित असताना जुन्नरसारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना उच्चशिक्षित करण्याचे स्वप्न पाहिले. त्यांनी दूरदृष्टीतून लावलेल्या रोपट्याचे रूपांतर आता सर्वसुविधांयुक्त महाविद्यालयरूपी वटवृक्षात झाले आहे, असे गौरवोदर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जुन्नर येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालयाच्या ‘सहकारमहर्षी शिवाजीराव तथा दादासाहेब काळे’ या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करताना ते बोलत होते.महाविद्यालयाच्या डीएनए प्रयोगशाळेचे उद्घाटन इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार पोपटराव गावडे, बाळासो दांगट, दिलीप ढमढेरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, माजी अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, युवक राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अतुल बेनके , जिल्हाध्यक्ष सुरेश घुले, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, शिवसेना जिल्हा परिषद गटनेत्या आशा बुचके, तात्यासाहेब गुंजाळ, संस्थेचे उपाध्यक्ष निवृत्ती काळे, विश्वस्त दत्तात्रय थोरात, अविनाश थोरात, सुभाष कवडे, अशोक काळे, अनिल जोगळेकर, प्राचार्य चंद्रकांत मंडलिक, उपप्राचार्य संभाजी गायकवाड जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.अजित पवार म्हणाले, की दादासाहेब काळे यांची जुन्नर तालुक्यात चांगलीच राजकीय पकड होती. परंतु केवळ राजकारण न करता शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी तालुक्यात शैक्षणिक क्षेत्राची पायाभरणी केली. त्याचा प्रत्यय महाविद्यालयाची सर्व सुविधांयुक्त इमारत, अत्याधुनिक प्रयोगशाळा, गुणवत्ता यातून येत आहे. विद्यमान अध्यक्ष संजय काळे चांगले काम करत आहेत असे सांगितले. पेट्रोल डिझेलचे भाव या सरकारने वाढवले. जुन्नर तालुक्याचे नाव दुष्काळी तालुक्यांच्या यादीत नाही. धरणात पाणी असूनदेखील पाण्याचे नियोजन बिघडवून टाकले आहे. राज्यात हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत या सरकारने शेतकऱ्यांना दिली पाहिजे. जिल्हा परिषदेचा अधिकार आता पालकमंत्री यांना दिला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचे अधिकार कमी केले आहेत, अशी टीका सरकारवर केली.तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेचे अध्यक्ष संजय काळे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, ‘तालुक्यात सहकार क्षेत्रात काम करणाºया शिवाजीराव काळे यांनी १९७० साली या शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्या वेळी संस्थेत १२९ विद्यार्थी शिकत होते,आता संस्थेत सहा हजार विद्यार्थी शिकत आहेत. गुणवत्तेच्या बाबतीत महाविद्यालय अग्रेसर आहे.’ आमदार शरद सोनवणे म्हणाले, ‘जुन्नर तालुका शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहे. शिवछत्रपती महाविद्यालय गुणवत्ता, सुविधा याबाबत आदर्श आहे. तालुक्यातील ९८ जिल्हा परिषदेच्या शाळांना आयएसओ नामांकन मिळाले आहे.>मान्यवरांकडून मदत जाहीरआजोबा महादेवराव काळे यांच्या स्मरणार्थ वर्गखोल्या बांधण्यासाठी आर्थिक मदत जाहीरअजित पवार यांनी महाविद्यालयासाठी मला एखादा मोठा प्रोजेक्ट सुचवा, कंपन्याचा सामाजिक निधी, खासदार निधी यातून निश्चित मदत करू,असे सांगितले.आमदार शरद सोनवणे व उद्योगपती किशोर दांगट यांनी ५ लाख रुपये देणगी जाहीर केली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार