ऐन दिवाळीच्या तोंडावर बारामतीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 11:15 AM2020-11-01T11:15:17+5:302020-11-01T11:15:38+5:30

काल रात्री उशिरा निघाले बदल्यांचे आदेश

Transfers of police officers in Baramati ahead of diwali | ऐन दिवाळीच्या तोंडावर बारामतीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या 

ऐन दिवाळीच्या तोंडावर बारामतीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या 

googlenewsNext

बारामती : ऐन दिवाळीच्या तोंडावर बारामतीत  पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी याबाबत ३१ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा आदेश दिले आहेत.
 
ठाण्यातील कार्यभाराचा कार्यकाल पूर्ण झाल्याने शहर व तालुका पोलीस ठाण्यांतील अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शहर व तालुका पोलीस ठाण्यातील एकूण ५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांची सासवड पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी नागपूर येथील पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे .

शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओंदुंबर पाटील यांची सायबर पोलिस स्टेशन ला  बदली झाली आहे .त्यांच्या जागी मुंबई पोलीस दलातील नामदेव शिंदे यांची नेमणूक  करण्यात आली आहे.

बारामती शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक पद्मराज गंपले यांची यवत पोलीस पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे. तर माळेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांची घोडेगाव पोलीस स्टेशन येथे बदली  करण्यात आली आहे.  शहरचे सहायक पोलीस निरीक्षक सुभाष मुंढे यांची वालचंदनगर पोलीस पोलीस स्टेशनला बदली झाली आहे. तर दौंड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची बारामती तालुका पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे. वालचंदनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सदाशिव जगताप यांची बारामती शहर पोलीस स्टेशनला नियुक्ती करण्यात आली आहे. शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे यांची बारामती शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलीस कर्मचाऱ्यांच्या  बारामती उपविभागातील पोलीस ठाण्यांत नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या कार्यकाळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार झालेल्या आरोपींना जेलची हवा खायला लावली. ग्रामीणच्या गुन्हेशोध पथकाने अनेक गुन्हे उघडकीस आणून आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले  होते. यामुळे घोलप यांची कामगिरी उत्कृष्ट होती. यामुळे त्यांनी आपल्या कामाचा समजात व  पोलीस क्षेत्रात ठसा उमटवला होता. डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे पोलीस खात्यातील नोकरीचा कालावधी पूर्ण झाल्या बरोबरच काही अधिकाऱ्यांचे विनंती बदल्याचे आदेश आले होते. त्यानुसार पोलीस अधिक्षक डॉ. देशमुख यांनी या  बदल्या केल्या आहेत .कोरोना महामारी च्या संकटात बारामती पॅटर्न राबविण्यात या अधिकाऱ्यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती.

Web Title: Transfers of police officers in Baramati ahead of diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.