पुणे : बसेसला आग लागण्याच्या घटनांनंतर जागे झालेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाने आता चालक, वाहकांसह सर्व कर्मचाऱ्यांना आग प्रतिबंधक उपकरणे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सलग अकरा दिवस हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.पीएमपीच्या बसेसला सातत्याने आग लागण्याच्या घटना घडत आहेत. देखभाल दुरूस्तीचा अभाव तसेच काही तांत्रिक कारणांमुळे या आगी लागत आहेत. एकीकडे आग लागत असताना संबंधित बसेसमध्ये अग्निशमन यंत्रच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर बहुतेक मुख्य बसस्थानके बसस्थानके, इमारतींमध्ये अग्निशमन यंत्र अस्तित्वात नसल्याचे उघडकीस आले.
पीएमपी कर्मचाऱ्यांना आग विझविण्याचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 20:38 IST
पीएमपीच्या बसेसला एकीकडे सातत्याने आग लागण्याच्या घटना घडत आहेत. संबंधित बसेसमध्ये अग्निशमन यंत्रच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
पीएमपी कर्मचाऱ्यांना आग विझविण्याचे प्रशिक्षण
ठळक मुद्देअग्निशमन यंत्र पुरविणाऱ्या खासगी संस्थेकडून हे प्रशिक्षण सर्व कर्मचाऱ्यांचा सहभाग