शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

बेळगावीमधील एका चार वर्षाच्या मुलाची औषधे पोहचविण्यासाठी मालगाडी आली धावून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 19:43 IST

मुलाच्या पुण्यातील काकाने पोलिसांकडे औषधे घेऊन जाण्याची परवानगी मागितली. पण दोनदा ही परवानगी नाकारण्यात आली

ठळक मुद्देबेळगावी येथील एका चार वर्षाच्या मुलाला लहानपणापासूनच अन्न गिळण्याचा त्रास

पुणे : बेळगावीमधील एका चार वर्षाच्या मुलाची होमिओपॅथिक औषधे संपली होती. या औषधांमुळे त्याचा अन्न गिळण्याचा त्रास कमी झाला होता. पण लॉकडाऊनमुळे पुण्यात येणे शक्य नव्हते. मुलाच्या पुण्यातील काकाने पोलिसांकडे औषधे घेऊन जाण्याची परवानगी मागितली. पण दोनदा ही परवानगी नाकारण्यात आली. अखेर या मुलाच्या मदतीसाठी रेल्वे धावून आली. अधिकाऱ्यांनी मुलाला औषधांची गरज ओळखून नकारघंटा न वाजविता एका मालगाडीतून ही औषधे बेळगावीला पोहचविली.बेळगावी येथील टिळकवाडीमध्ये एका चार वर्षाच्या मुलाला लहानपणापासूनच अन्न गिळण्याचा त्रास आहे. अन्ननलिकेचा आकार छोटा असल्याने त्याला व्यवस्थितपणे अन्न गिळता येत नाही. त्यावर उपाय म्हणून मागील दीड वर्षांपासून ते पुण्यातील डॉक्टरांकडून होमिऔपॅथिक औषधे घेत आहेत. त्यानंतर त्याचा अन्न गिळतानाचा त्रास कमी होऊ लागला. मुलाचे काका कधी पुण्यातून कुरिअरने औषधे पाठवत असत. तर कधी त्याचे वडील पुण्यात यायचे. पण लॉकडाऊनमुळे सर्वच ठप्प झाले. मुलाची औषधे संपल्याने पालकही चिंतेत होते. मुलाच्या काकांनी डॉक्टरांकडून औषधे घेतली पण ती पाठविणार कशी हा प्रश्न निर्माण झाला. पोलिसांकडे बेळगावीला औषधे नेण्याची परवानगी मागितली. पण दोनवेळा ही परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे सर्वजण हतबल झाले होते. यामध्ये दहा दिवस उलटून गेले. अखेर मुलाच्या वडिलांच्या बेळगावी येथील मित्राने तेथील रेल्वे अधिकाºयांना याबाबत सांगितले. त्यांनी तातडीने पुण्यातील रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मुलाच्या काकानेही अधिकाºयांना भेटत स्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले.पुणे रेल्वेचे संचलन व्यवस्थापक मयंक राणा व वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांनी मदतीचे आश्वासन दिले. तसेच बेळगावीला जाणाºया मालगाडीच्या गार्डकडे मुलाची औषधे सोपविली. ही औषधे बेळगावीमध्ये पोहचली. पण लॉकडाऊनमुळे पालकांनी तिथपर्यंत येणेही शक्य नव्हते. मग त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या  रेल्वेच्याच एका कर्मचाऱ्याने ही औषधे देण्यात आली. पालकांनी त्यांच्याकडून ही औषधे घेत रेल्वेचे आभार मानल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.-----------सध्या कोरोना हा एकमेव आजार नाही. इतरही आजारांचा सामना करावा लागत आहे. अनेकांना अशा अडचणी येत आहेत. प्रशासनाने त्या समजून घ्यायला हव्यात. अशा परस्थितीत रेल्वे अधिकाऱ्यांनी मदत केल्याने मुलाला औषधे मिळू शकली. आता दोन महिने काही अडचण नाही, अशी भावना मुलाच्या पालकांनी व्यक्त केली.

टॅग्स :Puneपुणेbelgaonबेळगावrailwayरेल्वेmedicineऔषधं