शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

पोलिस भरती चाचणीत धावताना तरुणाचा मृत्यू; शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 07:41 IST

पुण्यात पोलिस भरती दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील तरुणाचा दुर्देवी मृत्यू

पुणे :पुणेपोलिसांच्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीत धावणाऱ्या तुषार भालके या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शिवाजीनगर कवायत मैदानावर शनिवारी सकाळी घडली. मृत्यूमागचे नेमके कारण समजले नाही. मैदानावर धावताना तो सकाळी आठच्या सुमारास चक्कर येऊन पडला. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे निश्चित कारण समजेल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

तुषार बबन भालके (२७) मूळचा नगर जिल्ह्यातील संगमनेरजवळील कोठे बुद्रुक गावचा आहे. शेतकरी कुटुंबातील तुषार काही महिन्यांपासून पोलिस भरतीची तयारी करत होता. पुणे पोलिसांच्या भरतीसाठी शनिवारी शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील कवायत मैदानावर मैदानी चाचणी सुरू होती. यासाठी  ८०० ते ८५० उमेदावारांना मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांना क्रमांक देण्यात आले आहेत. सकाळी आठच्या सुमारास मैदानी चाचणीला सुरू झाली.

मैदानी चाचणीत धावण्यासाठी १६०० मीटरचे अंतर देण्यात आले होते. तुषारने धावण्यास सुरुवात केली. काही वेळात तो मैदानात चक्कर येऊन पडला. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.

तुषारच्या मागे आई-वडील, बहीण असा परिवार आहे. त्याच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती कळवण्यात आली आहे. ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतरच मृत्यूमागचे निश्चित कारण समजेल, असे पोलिस उपायुक्त पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसjobनोकरीAhmednagarअहमदनगर