शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीची समस्या, रस्त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करा; अजित पवार यांची पालिका प्रशासनाला सूचना

By राजू हिंगे | Updated: December 24, 2024 17:37 IST

 वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ‘माेबिलिटी प्लॅन’ तयार केला जाणार

पुणे : शहरातील वाहतूककाेंडीचा विषय गंभीर झाला आहे. त्यासाठी पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, मेट्राे, पीएमपी आणि वाहतूक पोलिस या सर्व घटकांना समाविष्ट करून ‘माेबिलिटी प्लॅन’ तयार केला जाणार आहे. शहरातील वाहतुकीची समस्या, रस्त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करावे. पालिकेच्या आगामी अंदाजपत्रकात रस्त्यांच्या कामासाठी अधिक तरतूद करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.शहरातील वाहतूककाेंडीसह विविध प्रश्नांसंदर्भात पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला पालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भाेसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., नगर अभियंता प्रशांत वाघमारे आदी उपस्थित हाेते. शहरातील वाहतूककाेंडीचा विषय गंभीर झाला आहे. त्यामुळे शहरातील वाहतूककाेंडी साेडविण्यासाठी पुढील महिन्यात बैठक आयोजित केली जाणार आहे. यात पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, मेट्राे, पीएमपी, वाहतुक पोलिस आदी सर्व घटकांना समाविष्ट करून माेबिलिटी प्लॅन तयार केला जाणार आहे.समाविष्ट गावांतील मिळकत करबाबत पुढील महिन्यात बैठकपुणे महापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या गावांतील मिळकत कर वसुली थकली आहे. मिळकत कर आकारणीवरून ग्रामस्थांकडून तक्रारी झाल्या हाेत्या. त्यानंतर राज्य सरकारने या गावांतील मिळकत कर वसुलीला स्थगिती दिली आहे. याचा परिणाम महापालिकेच्या मिळकत कराच्या उत्पन्नावर हाेत आहे. त्याच वेळी समाविष्ट गावांतही नागरी सुविधा पुरावायच्या आहेत. याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधले. त्यावर यासंदर्भात जानेवारी महिन्यात मंत्रालयात बैठक घेण्यात येईल. त्यातून मार्ग काढला जाईल, असे पवार यांनी सांगितले.जीएसटीचा वाटा महापालिकेस मिळावासमाविष्ट झालेल्या गावातील मूल्यवर्धित कराच्या (जीएसटी) उत्पन्नाचा वाटा ही महापालिका प्रशासनास मिळणे गरजेचे आहे, अशी मागणी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे महापालिका प्रशासनाने केली. महापालिकेच्या हद्दीत गावांचा समावेश झाल्यानंतर लोकसंख्येचा विचार करता. या गावांतून गोळा केला जाणाऱ्या जीएसटीमधील वाटा महापालिकेला मिळत नाही. हा वाटा महापालिकेला मिळण्याची गरज आहे, त्यावर बैठकीत चर्चा झाली. तसेच समाविष्ट गावांच्या विकास आराखड्याचा विषय या बैठकीत मांडल्याचे पृथ्वीराज पी. बी. यांनी सांगितले.रस्त्यांची कामे सलग कराशहरात रस्त्याची कामे तुकड्या-तुकड्यात केली जात आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले. शहरातील अतिक्रमणे, रस्ता रुंदीकरणाची कामे मार्गी लावली. रस्त्यांची कामे करताना तुकड्या-तुकड्यात नव्हे, तर सलग स्वरूपात करण्याचीही सूचना अजित पवार यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारMuncipal Corporationनगर पालिकाTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसcivic issueनागरी समस्या