शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

खासदारांच्या रॅलीतील ‘विना हेल्मेट’ चालकांवर वाहतूक पोलीस मेहरबान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2019 12:37 PM

शहरात सध्या चौकाचौकामध्ये घोळक्यानेच वाहतूक पोलीस कारवाई करताना दिसत आहेत.

ठळक मुद्देशहरात सध्या चौकाचौकामध्ये घोळक्यानेच वाहतूक पोलीस कारवाई करताना दिसत आहेत.

पुणे : नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांच्या सत्कारासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये दुचाकीवर सहभागी झालेल्या वाहनचालकांवर वाहतूक पोलीस मेहरबान झाल्याचे शुक्रवारी पाहायला मिळाले. मोठ्या संख्येने दुचाकीस्वार या रॅलीमध्ये सहभागी झाले होते खरे; परंतू यातील बहुतांश चालकांच्या डोक्यावर हेल्मेटच नव्हते. एरवी सर्वसामान्य नागरिकांच्या मानगुटीवर बसून दंड वसुली करणाऱ्या वाहतूक पोलिसांकडून रॅलीत सहभागी झालेल्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले. शहरात सध्या चौकाचौकामध्ये घोळक्यानेच वाहतूक पोलीस कारवाई करताना दिसत आहेत. सध्या शहरात हेल्मेट कारवाईवरच सर्वाधिक भर देण्यात येत असून यामधून लाखो रुपयांची दंड वसुली केली जात आहे. वास्तविक सर्वसामान्यांनी या कारवाईचा धसका घेतल्यासारखी स्थिती शहरात आहे. याविषयी वाहनचालक आणि नागरिकांमधून नाराजीचा सूर सतत उमटत असतो. कारवाई करताना नागरिकांची कोणतीही आर्जवं ऐकून न घेणाऱ्या वाहतूक पोलिसांनी खासदार बापट यांच्या रॅलीतील विना हेल्मेट वाहनचालकांना मात्र रान मोकळे सोडले. या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार किंवा नाही याबाबत साशंकता आहे. परंतू, वाहतूक पोलिसांची सर्वसामान्यांवर चालणारी  ‘दंड’गाई राजकीय कार्यकर्त्यांपुढेही चालणार हा प्रश्न आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rto officeआरटीओ ऑफीस