शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसाला लाच घेताना रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 20:46 IST

संभाजी पुलावर दुचाकीला बंदी असताना त्यावरुन आलेल्या वाहनचालकाकडून ७०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वाहतूक शाखेच्या पोलिसाला रंगेहाथ पकडले़.

ठळक मुद्देपावती मागितल्यावर त्यांना कसली पावती असे म्हणून निघून जाण्यास सांगितले़लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन

पुणे : संभाजी पुलावर दुचाकीला बंदी असताना त्यावरुन आलेल्या वाहनचालकाकडून ७०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वाहतूक शाखेच्या पोलिसाला रंगेहाथ पकडले़. रमेश रामकिसन शिरसाट (वय ३२) असे या पोलीस शिपायाचे नाव आहे़. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की, संभाजी पुलावरुन दुचाकी वाहनांना बंदी आहे़ तक्रारदार हे बाहेरगावाहून आलेले होते़. ते डेक्कनकडून टिळक रोडकडे जात असताना संभाजी पोलीस चौकीसमोर टिळक चौकात त्यांना शिरसाट यांनी पकडले व त्यांच्याकडे लायसन्सची मागणी केली़. त्यावेळी आपल्याकडे लायसन्स नसल्याची व या पुलावर नो एंट्री असल्याची माहिती नाही असे सांगितले़. त्यावर शिरसाट यांनी १२०० रुपयांची मागणी केली़. इतके पैसे नसल्याचे त्यांनी सांगितल्यावर शिरसाट यांनी दुचाकी ठेवून घेतली व पैसे घेऊन येण्यास सांगितले़. दुपारी सव्वादोन वाजता तक्रारदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आले़. त्यानंतर पोलिसांनी पडताळणी केली. तेव्हा शिरसाट हे पैशांची मागणी करीत असल्याचे आढळून आले़. त्यानंतर पाचच्या सुमारास टिळक चौकात सापळा लावण्यात आला़. तक्रारदारांनी त्यांना १२०० रुपये दिले़. त्यातील ५०० रुपये परत केले़.  त्यांनी पावती मागितल्यावर त्यांना कसली पावती असे म्हणून निघून जाण्यास सांगितले़. यावेळी तेथे सापळा रचून थांबलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी शिरसाट यांना रंगेहाथ पकडले़. विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे़. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे़.  

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसCorruptionभ्रष्टाचारAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग