बोरघाटात आईस्क्रीमचे बॉक्स पडल्यानं वाहतुकीचा खोळंबा
By Admin | Updated: April 4, 2017 14:06 IST2017-04-04T14:06:26+5:302017-04-04T14:06:26+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोरघाट परिसरात एका कंटेनरमधील आईस्क्रीमचे बॉक्स रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

बोरघाटात आईस्क्रीमचे बॉक्स पडल्यानं वाहतुकीचा खोळंबा
ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 4 - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोरघाट परिसरात एका कंटेनरमधील आईस्क्रीमचे बॉक्स रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यामुळे काही काळ परिसरातील वाहतुकीचा वेग मंदावला होता.
मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बोरघाट पोलीस चौकी ते अमृतांजन पुलादरम्यान चढण चढताना ही घटना घडली.
यानंतर बोरघाट महामार्ग पोलीस व आयआरबी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. व तासाभरात आईस्क्रीमचे सर्व बॉक्स मार्गावरुन बाजूला करण्यात आले. त्यामुळे तब्बल तासाभरानंतर येथील वाहतूक पूर्वपदावर आली.