शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

बाणेर येथील वाहतूक विभागाच्या नो पार्किंग कारवाई विरोधात व्यापारी व नागरिक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 14:23 IST

नो पार्किंग झोन रद्द नाहीच; वाहतूक पोलीस प्रशासन कारवाईवर ठाम..

ठळक मुद्देगेले काही आठवडे बाणेर येथे सहा किलोमीटर परिसरात दोन्ही बाजूला नो पार्किंग झोननो पार्किंग मधील कारवाईची टांगती तलवार ही सध्या तरी कायम राहणार

पाषाण: वाहतूक विभागाच्या नो पार्किंग कारवाई विरोधात बाणेरमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. व्यापारी संघटनांच्या वतीने व डॉक्टर संघटनांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनात पोलीस प्रशासनाकडून कोणतेच आश्वासन न मिळाल्याने व्यापारी व नागरिक आक्रमक झाले.    कुंदन मंगल कार्यालयासमोर मुख्य बाणेर रस्त्यावर हजारोच्या संख्येने नागरिक व व्यापारी व स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर ,स्वप्नाली सायकर , नितीन कळमकर, लहू बालवडकर, विशाल विधाते , मनोज बालवडकर, प्रकाश बालवडकर , प्रकाश तापकीर यांनी रस्त्यावर बसून पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला व रास्ता रोको करत आंदोलन केले. गेले काही आठवडे बाणेर येथे सहा किलोमीटर परिसरात दोन्ही बाजूला नो पार्किंग झोन करण्यात आले आहे यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून व्यापारी वर्गही त्रस्त झाला आहे. नो पार्किंग झोन विरोधात बाणेर येथील व्यापारी संघटना व डॉक्टर असोसिएशन तसेच विविध संघटनांनी बाणेर बंदला पाठिंबा दर्शवला होता. पोलीस आयुक्त विधाते यांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाहतूक विभागाचे डीसीपी यांनी याबाबत निर्णय घ्यावा अशी जमावाने मागणी केली. वाहतूक विभागाचे डीसीपी हे या या आंदोलनावेळी उपस्थित न राहिल्याने काहीकाळ जमाव आक्रमक झाला होता. बाणेर परिसरात अचानक झालेल्या रास्ता रोकोमुळे मोठ्या प्रमाणात बाणेर रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.  काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती दरम्यान एसीपी विधाते यांनी आंदोलकांना समजावत आंदोलकांनी शिष्टमंडळ घेऊन डीसीपी कार्यालयात सलावे अशी विनंती केली त्यानुसार बंद  कायम ठेवून व्यापारी व स्थानिक लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ वाहतूक विभागाच्या डीसीपी ना भेटण्यासाठी गेले यावेळी रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. 

   पोलीस प्रशासनाने नो पार्किंग संदभार्तील निर्णय त्वरित मागे न घेतल्यास व्यापारी संघटना व डॉक्टर असोसिएशन तसेच बाणेर परिसरातील विविध संघटना या निर्णयाच्या विरोधात मतदानावर बहिष्कार टाकतील असा इशारा देखील बाणेर व्यापारी असोसिएशन च्या वतीने देण्यात आला. ऑनलाइनसाठी घेतली तर घेणे व्यापारी असोसिएशन चे पदाधिकारी स्थानिक नगरसेवक व विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांनी वाहतूक शाखेच्या डीसीपींची भेट घेत निर्णय रद्द करण्यासंदर्भात निवेदन दिले.

नो पार्किंग झोन रद्द नाहीच वाहतूक पोलीस प्रशासन कारवाईवर ठाम   वाहतूक डीसीपी पंकज देशमुख यांनी बाणेर व्यापारी असोसिएशन स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध पक्षाचे कार्यकर्ते यांच्या शिष्टमंडळाला या नो पार्किंग झोनबाबत माहिती दिली व नो पार्किंग झोन रद्द करता येणार नाही. पुढील आठवड्यात पालिका प्रशासन व वाहतूक विभाग तसेच अन्य विभागाच्या संयुक्त बैठकी मध्ये याबाबत निर्णय घेता येईल, असे पंकज देशमुख यांनी आलेल्या शिष्टमंडळाला सांगितले.यामुळे बाणेर मधील नागरिकांच्या वर असलेली नो पार्किंग मधील कारवाईची टांगती तलवार ही सध्या तरी कायम राहणार आहे असेच स्पष्ट होते.

टॅग्स :BanerबाणेरParkingपार्किंगtraffic policeवाहतूक पोलीस