शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

व्यापार्‍याला लाथाबुक्क्यांनी मारहाण, पिता-पुत्रांना नारायणगाव पोलिसांनी केली अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 13:03 IST

किराणा व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत एका व्यापार्‍याने दुसर्‍या व्यापार्‍याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना नारायणगाव येथे घडली.

ठळक मुद्देकिराणा व्यापारी अशोसिएनच्या खोडद रोड येथील हॉलमध्ये सर्व व्यापार्‍यांसाठी दिवाळी निमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानेश्वर भोर व प्रमोद भोर यांची शेलोत यांच्या बरोबर शाब्दिक बाचाबाची झाली असता भोर यांनी धनंजय शेलोत यांना मारहाण केली.या प्रकरणी गुन्हा दाखल

नारायणगाव : दिवाळी निमित्त सवलतीच्या दरामध्ये ग्राहकांना किराणा साहित्याची विक्रीचे हॅण्डवेल छापले, या कारणावरून किराणा व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत एका व्यापार्‍याने दुसर्‍या व्यापार्‍याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना नारायणगाव येथे घडली. नारायणगाव पोलिसांनी मारहाण करणार्‍या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल केला आहे.ज्ञानेश्वर भोर व प्रमोद ज्ञानेश्वर भोर (दोघे रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यांच्यावर नारायणगाव पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम ३२५, ३२३, ५०४, ३४नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद सचिन उत्तमचंद शेलोत (वय ३७, रा. खोडद रोड, नारायणगाव ता. जुन्नर) यांनी दिली आहे.नारायणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किराणा व्यापारी अशोसिएनच्या खोडद रोड येथील हॉलमध्ये सर्व व्यापार्‍यांसाठी दिवाळी निमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आशीर्वाद ट्रेडिंग कंपनीचे सचिन बाळासाहेब शेलोत व धनंजय (धनेश) बाळासाहेब शेलोत हे दुकानामध्ये दिवाळी निमित्त सवलतीच्या दरामध्ये किराणा मालाची विक्री करतात. या कारणावरून ज्ञानेश्वर भोर व प्रमोद भोर यांची शेलोत यांच्या बरोबर शाब्दिक बाचाबाची झाली असता भोर यांनी धनंजय शेलोत यांना लाथाबुक्यांनी पोटात, चेहर्‍यावर व डोक्याला मारहाण केल्याने त्यास गंभीर दुखापत झाली. तसेच सचिन शेलोत हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास नारायणगाव पोलीस हे करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस